Home Breaking News केरळमध्ये डॉक्टरसह ‘झिका’चे २३ रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

केरळमध्ये डॉक्टरसह ‘झिका’चे २३ रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

0
केरळमध्ये डॉक्टरसह ‘झिका’चे २३ रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

केरळमध्ये डॉक्टरसह ‘झिका’चे २३ रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थातिरुअनंतपुरम – केरळमध्ये कोरोना संसर्गानंतर आता झिका विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत त्यामुळे राज्यात नवीन समस्या उद्भवू शकतात. हे लक्षात घेता राज्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी संपूर्ण केरळमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या केरळमध्ये झिका विषाणूच्या संसर्गाच्या चार नव्या घटना घडल्यानंतर संक्रमित लोकांची एकूण संख्या २३ वर पोहोचली आहे.

केरळमधील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटरमध्ये तिरुवनंतपुरम येथील १६ वर्षाच्या मुलीचे नमुना चाचणी तपासल्यानंतर तिला षाणूची लागण झाल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. या व्यतिरिक्त, एका खासगी रुग्णालयातील ३८ वर्षांच्या डॉक्टरांची कोयंबटूर येथील प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी केली असता त्यांनाही विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली. आरोग्यमंत्री म्हणाले की, पुंथुरा येथील रहिवासी ३५ वर्षीय व्यक्ती आणि येथील शाष्टमंगलम येथील ४१ वर्षीय महिला यांना देखील विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे.

दरम्यान, राज्यात झिका विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढत असल्याने लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.तसेच झीका विषाणूचा प्रसार एडिस डासांच्या चाव्याव्दारे होत असून, सध्या तिरुअनंतपुरम आणि ज्या जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत डेंग्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. सध्या राज्यात झिका विषाणूचे गांभीर्य स्पष्टपणे दिसत आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात झिका विषाणूच्या संसर्गाचा स्त्रोत शोधण्यात येत असून वेक्टर नियंत्रण उपाययोजना केल्या जात आहेत. यासह रुग्णालयांमध्ये ताप येण्याच्या घटनांसाठी झिका विषाणूची चाचणी घेण्यात येत आहे.