केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ११ टक्के वाढीव महागाई भत्ता मिळणार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11445*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

159

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ११ टक्के वाढीव महागाई भत्ता मिळणार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :नवी दिल्ली – कोरोनामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा रोखलेला ११ टक्के वाढीव महागाई भत्ता जुलैपासून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता १७ टक्के ऐवजी २८ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर ६ महिन्यांनी सुधारित महागाई भत्ता दिला जातो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे १ जानेवारी २०२० पासून त्यांचा महागाई भत्ता सरकारने रोखला होता. यामुळे त्यांना १७ टक्केच महागाई भत्ता दिला जात होता. जानेवारी २०२० मध्ये त्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ झाली होती. त्यानंतर जुलै २०२० मध्ये ३ टक्के महागाई भत्ता वाढला होता. जानेवारी २०२१ मध्ये ४ टक्के महागाई भत्ता वाढला होता. परंतु हा ११ टक्के वाढीव महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जात नव्हता. परंतु त्यावरील स्थगिती आता केंद्राने उठवल्यामुळे त्यांना जुलैपासून हा वाढीव ११ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. याचा फायदा ५० लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि ६१ लाखांपेक्षा अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.