Home Breaking News ती निघाली होती मुलांची विझवायला भूक आणि तहान, अखेर माउलीने मेयो रुग्णालयात...

ती निघाली होती मुलांची विझवायला भूक आणि तहान, अखेर माउलीने मेयो रुग्णालयात सोडले प्राण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11430*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

40 views
0

ती निघाली होती मुलांची विझवायला भूक आणि तहान, अखेर माउलीने मेयो रुग्णालयात सोडले प्राण

विदर्भ वतन, नागपूर : आई आणि तिची किमया सर्वतोपरी. आईची काळजी आणि पाल्यांप्रती असलेले तिचे सर्मपण, याची साधी व्याख्याही कुणी करू शकत नसावी. निसर्गाप्रमाणेच आईचे प्रेमही तेवढेच पवित्र.. शहरात उष्मा वाढला आहे. अशातच मुलांना तहान आणि भूख लागली म्हणून रेल्वेतून उतरलेली आई पुन्हा गाडीत चढलीच नाही. गाडी सुरू झाली अन् मुलेही आईच्या आशेने विव्हळत होती. तिकडे आई जीवनाशी संघर्ष करत होती. अखेर तिने मेयो रुग्णालयात प्राण सोडले.
नियती डाव साधून असेल तर कुणी काय करणार, अशीच काहीसी घटना नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर घडली. सविता राणी चंदन कुमार मेहता या बहीण गर्भवती असल्यामुळे तिच्या काळजीपोटी, देखभालीसाठी काजीपेठला निघाल्या. याकरिता त्या दानापूर-सिकंदराबाद या विशेष रेल्वेगाडीने काजीपेठला जात होत्या. त्यांच्यासोबत त्यांची ७ आणि १0 वर्षांची दोन मुले होती. याव्यतिरिक्त १८ वर्षीय भाऊदेखील होता. रेल्वेचे रिजर्व्हेशन मिळाल्यानंतर त्या दानापूर-सिकंदराबाद या विशेष रेल्वेगाडीच्या कोच क्रमांक एस ८ च्या बर्थ क्रमांक १७ आणि १८ वरून सर्व प्रवास करीत होते. दरम्यान, ही गाडी नागपूर स्थानकावर ११.१0 वाजता पोहोचली. लांबच्या प्रवासात मुलांनी काहीही खाल्ले नसल्याने त्यांना भूख लागली होती. शिवाय, नागपूरसह विदर्भात उष्मा वाढल्यामुळे चिमुकल्यांचा गळाही कोरडा झाला. परिणामी, मुलाची भूख आणि तहान भागविण्याकरिता सविता राणी या नागपूर रेल्वे स्थानकावर उतरल्या. परंतु, त्यांचे तिकीट ज्या गंतव्यस्थानावरचे होते तेथे न पोहोचता त्यांनी थेट इहलोकांचा निरोप घेतला. भुकेल्या आणि तहानलेल्या मुलांकरिता खाद्यपदार्थ विकत घेत असतानाच गाडी निघाली. गाडी निघाल्याचे बघता अनेक प्रवासी हे गाडीकडे धावले. प्रवाशी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत होते. असाच प्रयत्न सविता राणीसुद्धा करीत होत्या. परंतु, त्यांना तसे जमले नाही. धावत्या रेल्वेगाडीत चढत असताना त्यांचा तोल जाऊन त्या फलाटावर आदळल्या. यातच त्यांच्या छाती, खांदा आणि कंबरेला मुका मार लागला. फलाटावर जखमी अवस्थेत पडलेल्या सविता राणी यांची प्रकृती बघता लगेच त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. अचानक आई निघून गेली बघता लहान मुलांवर ओढवलेले हे दु:ख आभाळाएवढेच होते. या चिमुकल्यांचे चेहरे पाहून येथे उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.