आम आदमी पार्टी युवा आघाडीचे स्वप्नील लोणकर आत्महत्या व रखडलेल्या पोलीस भरती विरोधात आक्रोश आंदोलन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11425*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

200

आम आदमी पार्टी युवा आघाडीचे स्वप्नील लोणकर आत्महत्या व रखडलेल्या पोलीस भरती विरोधात आक्रोश आंदोलन

विदर्भ वतन, नागपूर : मंगळवारी दुपारी गांधीगेट छत्रपती शिवाजी महाराज चौक नागपूर येथे आम आदमी पार्टी युवा आघाडीने आक्रोश आंदोलन केले. हे आंदोलन राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या मार्गदशनात व आप युवा आघाडी विदर्भ संयोजक पीयूष आकरे व नागपुर युवा आघाडी संयोजक गिरीश तितरमारे यांच्या नेतृत्वात हे आक्रोश झाले. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एमपीएससी पास होऊन नोकरी न मिळाल्या स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली. राज्यात पोलीस भरती परीक्षा देखील रखडल्या आहेत. तातडीने भर्ती घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळउन द्यावे या मागणीसह आप युवा आघाडी सत्तात्याने प्रयत्न करीत आहे. या आंदोलनात मध्य नागपुर संयोजक प्रभात अग्रवाल, हेमंत पांडे, गणेश सराटे, बबलू मोहाडीकर, वैभव मेश्राम, सोंकुवर जी अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्तित होते.