Home इतर वाढत्या गुन्हेगारीवर तात्काळ अंकुश लावा व जनतेला भयमुक्त करा

वाढत्या गुन्हेगारीवर तात्काळ अंकुश लावा व जनतेला भयमुक्त करा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11420*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

112 views
0

वाढत्या गुन्हेगारीवर तात्काळ अंकुश लावा व जनतेला भयमुक्त करा

– आम आदमी पार्टीची मागणी

विदर्भ वतन,चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, राजुरा, घुग्गुस शहरामध्ये गुन्हेगारीची सद्यस्थितीत प्रचंड वाढ झालेली आहे. जिकडे तिकडे खेळण्यासारखे बंदुका निघत आहे व गुन्हेगारांमध्ये पोलिस प्रशासनाचा धाक उरलेला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगार आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांवर संघटित गुन्हेगारी मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे व जनतेला भयमुक्त करावे तसेच मुख्य शहरातील सीसीटीवी सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ सुरू करून वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालावा. जेणेकरून सामान्य नागरिकांचा बळी जाणार नाही.
वरील बाबीचे निवेदन माननीय पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले निवेदन देताना सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष, भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष, मयुर राईकवार माजी जिल्हाध्यक्ष तसेच संस्थापक सदस्य,हिमायु अली, पदाधिकारी संतोष दोरखंडे,जिल्हा सचिव, सूर्यकांत चांदेकर जिल्हा सहसचिव, इत्यादी उपस्थित होते