कृष्णा वाल्मीकी च्या हत्यारांना फासी द्या अन्यथा आंदोलन करू

– राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर विभाग अध्यक्ष नंदूभाऊ गट्टूवार यांची मागणी.

विदर्भ वतन,चंद्रपूर : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील झालरापाटन शहरात एका समाजातील काही सदस्यांनी कृष्णा वाल्मीकिचा खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी या निर्दय हत्येच्या घटनेचा व्हिडिओदेखील बनविला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे. या हत्याकांडाच्या निषेधार्थ नंदूभाऊ गट्टुवार (राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर विभाग अध्यक्ष) यांनी पंतप्रधान व भारत सरकारकडे मागणी केली आहे कि मारेक-यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी. मृतक कृष्णा वाल्मीकिच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये दिले जावेत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली पाहिजे अशा मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले आहे. आरोपींवर कार्रवाई न केल्यास आंदोलन केले जाईल, ज्यांची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल अशा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना नंदूभाऊ गट्टुवार,शिवा भाऊ सरदार राष्ट्रीय मजदूर परिषद जिल्हाध्यक्ष, अभिजित भाऊ, ओजस्विनी जिल्हाध्यक्ष, दीक्षा एडला चंद्रपूर जिल्हा प्रभारी, निलेश नंत राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर महानगर सरचिटणीस, हेमंत बोमिद्वार कार्यकर्ते, राहुल देवतळे आदि उपस्थित होते.

You missed