Home Breaking News नाशिकमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करताना झाला स्फोट

नाशिकमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करताना झाला स्फोट

0
नाशिकमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करताना झाला स्फोट

नाशिकमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करताना झाला स्फोट

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :नाशिक- नाशिक शहराच्या इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्या रेसिडन्सीच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करताना स्फोट झाला. त्या स्फोटात बाईक पूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्या रेसिडन्सीमध्ये काल एक व्यक्ती त्याची इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करत होता. यावेळी काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यानं बाईकचा स्फोट झाला आणि जाग्यावर केवळ बाईकचा सांगाडा राहिला आहे. सुदैवानं या घटनेत जीवितहानी झालेली नाही. या अपार्टमेंटमध्ये राहणारी 6 कुटुंब सुखरुप असल्याची माहिती आहे. हा स्फोट झाल्यानं विजेचे 6 मीटर जळाले. त्यानंतर इमारतीचा वीज पुरवठा खंडित झाला. दरम्यान, काही नागरिक इलेक्ट्रिक बाईक घेत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक बाईक चार्जिक करताना काळजी घेतली नाही तर काय होते याचा प्रत्यय आणून देणारी घटना नाशिकमध्ये घडली.