Home Breaking News लष्कर परिवारासाठी ती रात्र ठरली अखेरची

लष्कर परिवारासाठी ती रात्र ठरली अखेरची

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11391*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

37 views
0

लष्कर परिवारासाठी ती रात्र ठरली अखेरची
-खंडित वीज पुरवठयामुळे जनरेटरने घेतले सात बळी

विदर्भ वतन, चंद्रपूर : मूसळधार पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने दारे खिडक्या बंद असलेल्या स्थितीमधील घरात जनरेटरमध्ये स्फोट होऊन विषारी वायूची गळती झाल्याने एकाच कुटुंबातील सहा लोकांचा झोपेतच दुदैर्वी मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुगार्पूर येथे घडल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरात १२ जुलैला मूसळधार पावसाला सुरुवात झाली. दुगार्पुरात डीपी उडाल्याने काही परिसरातील वीजपुरवठा ठप्प झाला. दुगार्पुरात राहणा-या लष्कर कुटुंबाच्या घरी मुलगा अजय यांचा विवाह समारोह १0 दिवसांपूर्वीच पार पडला होता. दोन दिवसांपूर्वीच नववधू माधुरी भावी आयुष्याचे सोनेरी स्वप्न मनात रंगवत सासरी पोहचली. मूसळधार पावसामुळे अचानक परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने रमेश लष्कर यांनी रात्री जनरेटर सुरू केले. मात्र हेच जनरेटर आपल्या परिवाराचा घात करेल अशी पुसटशी कल्पनाही मनाला शिवली नव्हती. दरम्यान घराची सर्व दारे खिडक्या बंद असल्याने जनरेटरचा धूर घरात जमा होऊ लागला. धुराचा दाब आणि जनरेटरचे तापमान यामुळे अचानक जनरेटरचा स्फोट झाला आणि त्या स्फोटाने जनरेटरमधील विषारी वायूची गळती झाल्याने सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर दासू लष्कर यांना गंभीर स्थितीत दवाखान्यात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये अजय लष्कर (वय २१), रमेश लष्कर (वय ४५), लखन लष्कर (वय १0), कृष्णा लष्कर (वय ८), पूजा लष्कर (वय १४), माधुरी लष्कर (वय २0) व दासू लष्कर यांचा समावेश आहे. लष्कर कुटुंब नेहमी सकाळी ६ वाजता उठायचे मात्र मंगळवारी कुटुंबातील कुणीही बाहेर न आल्याने शेजा-यांनी दार ठोकले असता कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजा-यांनी दरवाजा तोडत आत प्रवेश केला असता आत सर्वदूर धूर पसरला होता. शेजा-यांनी सर्वांना बाहेर काढले व रुग्णालयात नेले मात्र आधीच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर एक जण बेशुद्धावस्थेत होता, त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारासाठी नागपूरला नेले असताना त्याचा मृत्यू झाला. सातजणांच्या मृत्यूने शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस उपविभागीय अधिकारी शीलवंत नांदेडकर व दुगार्पूरचे पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.