विदर्भ वतन वृत्तपत्र, चंद्रपूर – दुर्गापूर येथे जनरेटर गॅसच्या गळतीने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दुर्गापूर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने विजेसाठी जनरेटर सुरू केले होते. अशातच हे कुटुंब झोपी गेले आणि गॅस गळती होऊन मोठी दुर्घटना घडली. हा प्रकार दिसताच शेजारी राहणारे लोकांनी आरडाओरड केली. जनरेटरमधील गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या मुलासहीत १४ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाला. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. रात्री विज खंडीत झाल्यामुळे कुटुंब जनरेटर लावून झोपी गेले व येथेच घात झाला़ यात नववधुचाही मृत्यु झालेला आहे़ शेजाºयांना हा प्रकार कळताच त्यांनी सर्वाना रूग्णालयात हलविले मात्र डाँक्टरांनी त्यांना मृत घोषित केले़ या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे़ तर कुटुंबावर आलेल्या संकटामुळे नातेवाईकही हादरले आहे़ पुढील तपास पोलिस विभाग करीत आहे़

You missed