Home Breaking News माझे नेते मोदी, शाह, नड्डा़ – पंकजा मुंडेंनी फडणवीसांचा उल्लेख टाळला!

माझे नेते मोदी, शाह, नड्डा़ – पंकजा मुंडेंनी फडणवीसांचा उल्लेख टाळला!

85 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल – केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारातून प्रीतम मुंडे यांना वगळण्यात आले़ त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी यावर नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही, तर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करत बीड, अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकाºयांनी राजीनामेही दिले. राजीनामे दिल्यानंतर आज मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टळावे, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. त्यामुळे आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
मी कुणाला भीत नाही, पण मी आदरही करते. निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. मी माज्यापेक्षा वयाने मोठं असणा-या व्यक्तींचा अनादर केला नाही. मी निर्भय आहे ते तुमच्याच जीवावर. कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. कोणताही माणूस कोणताही निर्णय घेतो, तो लाभार्थी असतो. मी सगळ्या पक्षांच्या याद्या बघितल्या, तर एक व्यक्ती स्वत:चा विचार करून काहीही मिळवू शकतो. मला माज्यासाठी नकोय, तुमच्यासाठी हवंय. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझं ऐका. आपण कष्टाने बनवलेलं घरं का सोडायचं. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.
माझे नेते मोदी, शाह, नड्डा आहेत. त्यांच्या मनात माज्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. मला माझ्यासाठी काही नकोय. मला प्रीतमसाठी काही नकोय. मला भाजपाने अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणं शक्य नाही. मी म्हणाले धन्यवाद. नंतर रमेश कराडांचं नाव आलं, काय बिघडलं? मी कोण आहे तुम्ही तर प्रोटोकॉलने माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, मला सजवण्याचा प्रयत्न करू नका, असं पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाल्या.