Home Breaking News नितीन गडकरी यांच्या हस्ते 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन

नितीन गडकरी यांच्या हस्ते 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11373*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

310 views
0

नितीन गडकरी यांच्या हस्ते मणिपूरमध्ये 4,148 कोटी रुपयांच्या 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली

विदर्भ वतन, नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मणिपूरमध्ये 298 किलोमीटर लांबीच्या 4,148 कोटी रुपये खर्चाच्या 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्?घाटन व पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे मणिपूरला देशाचा उर्वरित भाग आणि शेजारी देशांना जोडणारे सर्व प्रकारच्या हवामानाला अनुकूल रस्ते उपलब्ध होतील. यामुळे या प्रदेशाच्या कृषी, औद्योगिक आणि सामाजिक आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. तसेच दुर्गम भागात आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध होतील आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी निर्माण होतील.

इंफाळ येथे प्रकल्पांचे उद्?घाटन करताना गडकरी म्हणाले की, राज्यासाठी 5000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे आणि विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सहा महिन्यांत पूर्ण होतील आणि एका वर्षाच्या आत काम सुरू होईल. ते म्हणाले की, भारतमाला टप्पा ह्णह्ण अंतर्गत राज्यातील महामार्गांच्या विस्ताराची शिफारस केली जाईल .ते म्हणाले की पंतप्रधान ईशान्य प्रदेशाला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत.

रस्ते संबंधी पायाभूत सुविधा मणिपूरच्या विकासाला हातभार लावतील आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या बळकट बनवतील असेही ते म्हणाले.