कांग्रेस पदाधिकारी मानसिंग अहिरवार यांचा कार्यकर्त्यनसह आप मध्ये प्रवेश

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11367*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

280

कांग्रेस पदाधिकारी मानसिंग अहिरवार यांचा कार्यकर्त्यनसह आप मध्ये प्रवेश

विदर्भ वतन, नागपूर : राष्ट्रनिर्माण तसेच पक्ष संघटन विस्तार कार्यक्रम अंतर्गत युवा तसेच पक्षाचे ध्येय धोरण आत्मसात करून राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल ह्यांचे नेतृत्व ध्येय धोरणे स्वीकारून अनेक नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.


नागपूर शहर विधानसभा क्षेत्र उत्तर नागपूर येथे उत्तर नागपुर विधानसभा कांग्रेस अनुसूचित जातिचे सदस्य सचिव मानसिंग अहिरवार यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह रविवार दिनांक ११/०७/२०२१ ला समता नगर, नारा रोड, येथे देवेंद्र वानखेडे, विदर्भ संयोजक ह्यांच्या नेतृत्वाखाली तसेच पक्षाचे उच्चपदस्थ प्रमुखांच्या उपस्थिती मध्ये त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष श्री जगजीत सिंह, नागपुर शहर संयोजिका श्रीमती कविता सिंघल, विदर्भ संगठन मंत्री आकाश सफेलकर, नागपुर शहर सचिव भूषण ढाकुलकर, नागपुर शहर संघठन मंत्री शंकर इंगोले, उत्तर नागपुर प्रभारी जितेन्द्र मुरकुटे, उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे, उत्तर नागपुर संघटन मंत्री प्रदीप पौनिकर, उत्तर नागपुर सचिव गुनवंत सोमकुंवर उत्तर नागपुर महिला संघठन मंत्री स्वीटी इंदुरकर, उत्तर नागपुर सह संयोजक विजय नन्दनवार, मीडिया प्रमुख विशाल वैद्य, उत्तर नागपुर युवा अध्यक्ष स्वप्निल सोमकुंवर, उत्तर नागपुर युवा सचिव पंकज मेश्राम आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि समस्त जनत उपस्थित होती. पक्ष विस्तार आणि मनपा निवडणूक समोर ठेवून मानसिंग अहिरवार ह्यांना उत्तर नागपुर सह संयोजक पदाची जबाबदारी पक्षाने सोपविलेली आहे.