आमदार राजूभाऊ पारवे यांनी कोविड-१९ ने दगावलेल्या कुटुंबियांना भेट

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11359*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

180

आमदार राजूभाऊ पारवे यांनी कोविड-१९ ने मरण पावलेल्या वक्तीच्या कुटुंबियांना दिली भेट

विदर्भ वतन, नागपूर : उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांनी पालकतत्व मोहिमे अंतर्गत रवीवारला कुही तालुक्यातील सिल्ली या गावातील कोविड-१९ ने दगावलेल्या कुटुंबियांना भेट दिली.


कोविडमध्ये बरेच कुटुंब उध्वस्त झाले आहे. त्यातच एक कुटुंब सिल्लीचा राजू शंकर लांजेवार वय 35 वर्ष त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं व दोन एकर शेती असा प्रपंच. आपले कुटुंब शेती करून चालवायचा. अशातच कोरोनाने त्याचा जीव गेला. अशातच उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजुभाऊ पारवे यांनी लांजेवार परिवाराला भेट देत धीर दिला व आर्थिक मदत केली. कोरनामुळे दगावलेल्या अशोक पडोळे, लक्ष्मण पडोळे यांच्या कुटुंबियांना भेट देऊन सांत्वना केली. कोणते ही काम असलायस मला एक भाऊ म्हणून एक काका म्हणून कळवा असा शब्द दिला.
या वेळी माजी पंचायत समिती सदस्य हरिष कडव, उपसरपंच अंबादास लांजेवार, जितेंद्र गिरडकर, विकास काकडे, दत्तू शेंडे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.