
घरकुल लाभार्थ्याना 5 ब्रास रेती नि:शुल्क देण्यात यावी
– बंडू कापसे (ग्रा. पं. खैरी सरपंच परिषद अध्यक्ष) यांनी निवासी उपिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
विदर्भ वतन, नागपूर : घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती नि:शुल्क देण्यात यावी या मागणीचे निवेदन सोमवारी बंडू कापसे (ग्रा. पं. खैरी सरपंच परिषद अध्यक्ष) व उपाध्यक्ष गुणवंता माकडे, उपसरपंच ग्रा.पं. भिळगाव यांनी निवासी उपिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
कामठी तालुक्यातील पंतप्रधान घरकुल योजना लाभार्थ्यांना शासनाचा परिपत्रकानुसार 5 ब्रास वाळू प्रत्येक लाभार्थ्यांना नि:शुल्क दयावे असे निवेदन मा. निवासी उपिल्हाधिकारी अविनाश कातडे यांना देण्यात आले.
या निवेदनावर तात्काळ कारवाई करून नागपूर जिल्ह्याचे खनीकर्म अधिकारी यांना आदेश करून कामठी तालुक्यातील पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व लाभार्थ्यांना वाळूची पास टीपी देण्यात यावी असा आदेश करण्यात आला व 2 ते 3 दिवसा मध्ये कामठीचे तहसीलदार मा. अरविंद हिंगे यांनी शासनाचा परिपत्रकानुसार वाटप करावे असे दूरध्वनी वरून सांगण्यात आले. निवासी उपिल्हाधिकारी अविनाश कातडे यांचे सरपंच परिषद कामठी तालुकाच्या वतीने आभार मानण्यात आले.

