कोरोनाच्या तिस-या लाटेत दिवसाला आढळू शकतात ६ लाख २१ हजार रुग्ण : टास्क फोर्स

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11351*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

193

कोरोनाच्या तिस-या लाटेत दिवसाला आढळू शकतात ६ लाख २१ हजार रुग्ण : टास्क फोर्स

विदर्भ वतन,नागपूर : देशात कोरोना रुग्णांमध्ये घट झालेली असली तरी अजूनही कोरोना प्रादुभार्वाची दुसरी लाट संपलेली नाही. यातच तिस-या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने तिस-या लाटेतील परिस्थिती हाताळण्यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे.
सूत्राच्या माहितीनुसार टास्क फोर्सने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाचा तिसरी लाट आल्यास देशात दिवसाला तब्बल ६ लाख २१ हजार रुग्ण आढळू शकतात. दुस-या लाटेत दैनंदिन रुग्णवाढीचा आकड१ा ४ लाख १४ हजारांपर्यंत पोहोचला होता.
याशिवाय कोरोना प्रादुभार्वाच्या तिस-या लाटेत देशात एका दिवसात सक्रिय रुग्णाची संख्या १ कोटीच्या घरात पोहोचू शकते. अशा परिस्थितीत कोणकोणत्या वैद्यकीय सुविधांची गरज भासेल याची पूर्वनियोजित तयारी करण्यास टास्क फोर्सने सुरुवात केली आहे. टास्क फोर्स तयार केलेल्या रोड मॅपनुसार १कोटी संक्रिय रुग्णांपैकी २३ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासू शकते. यानुसार जवळपास ६९ हजार जनांना आयसीयू बेड्स आणि ३ लाख ४५ हजार जणांना आॅक्सिजन बेड्सची गरज भासेल.
सरकारच्या आकडेवारी नुसार सध्या २ लाख ५५ हजार आॅक्सीजन बेड्स उपलब्ध आहेत. कोरोनाच्या तिस-या लाटेत परिस्थिती आणखी बिकट झाली तर जवळपास ९० हजार आॅक्सीजन बेड्सची कमतरता देशात भासू शकते.
संभाव्य तिस-या लाटेसाठी सरकारी पातळीवर तयारी केली जात असली तरी ऐन वेळी नेमकी काय परिस्थिती निर्माण होईल, याचा अचूक अंदाज व्यक्त करण कठीण आहे.
दुस-या लाटेत १५ ते २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली होती तरी रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नव्हते. कोरोनाच्या तिस-या लाटेपासून वाचण्यासाठी सरकारने २५०० कोटी रुपयांच्या कोरोना लस खरेदीची तयारी देखील सुरू केली आहे. जास्तीत जास्त वेगाने लसीकरण हाच एक रामबाण उपाय सध्या सरकार समोर आहे. त्यामुळे तिस-या लाटेचा धोका कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते.