
नीटची परिक्षा 12 सप्टेेंबरला, केेंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली- राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) 12 सप्टेंबर 2021 रोजी संपूर्ण देशात घेतली जाणार आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षांबाबत विद्यार्थी केेंद्रीय शिक्षण मंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारत होते. अखेर आज त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा होणार आहे.
देशभरात एकाचवेळी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज उद्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून ntaneet.nic. in वर उपलब्ध असणार आहे. याआधी ही परीक्षा 1 ऑगस्ट रोजी असल्याचे सांगण्यात आले होते.

