Home Breaking News उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये वीज अंगावर पडून ४९ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये वीज अंगावर पडून ४९ जणांचा मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11330*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

42 views
0

उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये वीज अंगावर पडून ४९ जणांचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : लखनऊ – उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये काल रविवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तब्बल ४९ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील ३० जणांचा आणि राजस्थानमधील १९ जणांचा समावेश आहे. उत्तरप्रदेशात प्रयागराजमध्ये १४, कानपूर देहातमध्ये ५, कौशंबीमध्ये ४ तर फिरोझाबादमध्ये ३ आणि उन्नाव तसेच चित्रकूटमध्ये प्रत्येक २ जणांना वीज पडल्याने मृत्यू झाला.

राजस्थानमध्येही वीज पडल्याने १९ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू हा एकट्या जयपूरमध्ये झाले. राज्यातील वेगवगळ्या भागांमध्ये वीज पडल्याच्या घटनांमध्ये १७ जण जखमी झाले. जयपूर, ढोलपूर, कोट्टा आणि जहालवार जिल्ह्यांमध्ये काल मान्सूनचे दमदार आगमन झाले. उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे गाझीपूर, फिरोझाबाद, बलियामध्ये काही ठिकाणी लोक वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहे. राजस्थानच्या अंबर किल्ल्याजवळ वीज पडल्याची घटना घडली. त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. शेळ्या चारायला गेलेल्या जहालवार येथील एका तरुणाचा चार मुलांबरोबर वीज पडल्याने मृत्यू झाला. ढोलपूरमधील बारी परिसरातील तीन मुलांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे.