अभिनेता सुनील शेट्टी राहत असलेली मुंबईतील इमारत सील

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11325*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

295

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – अभिनेता सुनील शेट्टी मुंबईत ज्या ठिकाणी राहतात ती इमारत सील करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईच्या अल्टामाऊंट रोडवरील ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ नावाच्या या इमारतीत कोरोना रुग्ण सापडल्याने इमारत सील करण्यात आली आहे. पालिकेच्या नियमानुसार, एखाद्या इमारतीत पाचहून अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास त्या इमारतीला मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करून सील केले जाते. तर पाचहून कमी कोरोना रुग्ण असणाऱ्या इमारतींमध्ये केवळ रुग्ण आढळलेला मजला सील केला जातो. याच नियमानुसार सुनील शेट्टी यांची इमारत सील करण्यात आली. दरम्यान, सुनील शेट्टी किंवा त्याच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की, ‘पृथ्वी अपार्टमेंट्स इमारतीला कोरोनामुळे दोन दिवसांपूर्वी सील केले.’ अभिनेते सुनील शेट्टी हे मागील काही वर्षांपासून या इमारतीत राहतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी माना शेट्टी, त्यांची मुलगी अथिया शेट्टी आणि लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा त्यांचा मुलगा अहान शेट्टी राहतो. तसेच अल्टामाऊंट रोड हा मुंबईतील सर्वात पॉश परिसरांपैकी एक आहे. रियल इस्टेटच्यादृष्टीनेदेखील हा भाग जगातील सर्वात महागड्या परिसरांपैकी एक मानला जातो.’

महत्त्वाचे म्हणजे कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत काही दिवसांपासून कोरोनाचा दैनंदिन आकडा सातशेच्या खाली आला आहे. परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता महापालिकेकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे.