नाभिक समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी शासनाने केश शिल्पी बोर्डाचे पुनर्घटन करावे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11315*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

149

नाभिक समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी शासनाने केश शिल्पी बोर्डाचे पुनर्घटन करावे

– राष्टÑीय जनसेवा पक्षाच्या चंद्रपूर शाखेच्या वतीने जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

विदर्भ वतन, चंद्रपुर : महामारीच्या काळात स्वत:ची दुकाने बंद ठेवून झळ सोसणार्या नाभिक समाजाला आर्थिकदृष्ट्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी शासनाने केश शिल्पी बोर्डाचे पुनर्घटन करून सदर बोर्डाला लवकरात लवकर आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा. नाभिक समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी राष्टÑीय जनसेवा पक्षाच्या चंद्रपूर शाखेच्या वतीने जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.
जिल्हाधिकायांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेले हे निवेदन देताना राष्टÑीय जनसेवा पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर हनुमंते, उपाध्यक्ष शैलेश कडूकर, जिल्हा महिला अध्यक्ष अलका वाटकर, उपाध्यक्ष सायली दहिवलकर, सचिव सरिता वर्दिलवार प्रामुख्याने उपस्थित होते.
नाभिक समाज गरीब आहे. रोज कमाविलेल्या दैनंदिनी कमाईतून कुटुंबाचा संसार चालवितो. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. केश श्सिाल्पी बोर्डाचे पुनर्घटन करून 30 टक्के अनुदानाने कर्ज पुरवठा करण्यात यावा. ज्या नाभिक दुकानदारांची स्वमालकीची दुकाने आहेत त्यांना संपत्ती कर, वीजबिल, पाणीकर इत्या. तीन वर्षे माफ करावे, लॉकडाउन मध्ये आत्महत्या केलेल्या नाभिकांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत द्यावी. इत्या. मुख्य मागण्यांचा समावेश आहे.