Home Breaking News शेताच्या धू-यावर काट्या टाकल्यावरुन दोन आरोपींनी एका शेतक-याला केली बेदम मारहाण

शेताच्या धू-यावर काट्या टाकल्यावरुन दोन आरोपींनी एका शेतक-याला केली बेदम मारहाण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11310*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

49 views
0

शेताच्या धू-यावर काट्या टाकल्यावरुन दोन आरोपींनी एका शेतक-याला केली बेदम मारहाण

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,भिवापूर- शेताच्या धू-यावर काट्या टाकल्यावरुन दोन आरोपींनी एका शेतक-याला बेदम मारहाण केली. त्यात शेतक-याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना तालुक्यातील चोरविहिरा येथे शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी आरोपीं विरुद्ध गुन्हा नोंदविला असून कारवाई सुरू केली आहे.
शेषराव रंदई व लिलाधर चौधरी हे दोन्ही रा. चोरविहिरा ता. भिवापूर अशी आरोपींची नावे असून मारुती चिंधू खाटे (५५ रा चोरविहिरा ता. भिवापूर) असे जखमी शेतक-यांचे नाव आहे.

शुक्रवारी मारुती खाटे हे आपल्या शेतात काम करीत होते. वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी शेताच्या धू-यावर काट्या टाकल्या दरम्यान सायंकाळी ४:३० वाजता च्या सुमारास दोन्ही आरोपींनी तेथे येऊन रस्त्याचा वाद उकरून काढत धू-यावर काट्या टाकल्यावरुन वाद घातला अशातच आरोपींनी खाटे यांना मारहाण केल्यामुळे पायाला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी शेतक-यांस भिवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र पायाला फ्रॅक्चर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूरला हलविले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२५, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रकाश चंगोले करीत आहेत.