Home Breaking News “कविता नंतर फुलते,आधी आपण फुलून यावे लागते” -प्रा. प्रवीण दवणे

“कविता नंतर फुलते,आधी आपण फुलून यावे लागते” -प्रा. प्रवीण दवणे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11300*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

39 views
0

“कविता नंतर फुलते,आधी आपण फुलून यावे लागते” -प्रा. प्रवीण दवणे

“मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित आषाढस्य प्रथम दिवसे कविसंमेलन आणि स्वर्गीय केशवराव मारोतकर काव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न”
************************

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- “कविता नंतर फुलते ,आधी आपण फुलून यावे लागते” या प्रक्रिये नुसार
कागदावर आपली कविता उमटते, ही अभिव्यक्तीच नितांत महत्त्वाची असते .मराठी कवितेची ही परंपरा जपण्याचे कार्य अनेक साहित्य संस्था मार्फत होत असते,असेच कार्य
माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने केल्या जात आहे .याचा मला नितांत आनंद वाटतो.आषाढस्य प्रथम दिवसे निमित्त आयोजित कविसंमेलनात सहभागी कवींना स्वर्गीय केशवराव मारोतकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणे म्हणजे अशा प्रकारच्या पारितोषिकांनी कवितेची चळवळ सुरू ठेवत , कवितेला बळ देणे होय.अतिशय महत्त्वाचं कार्य गेल्या दहा वर्षापासून तळमळीने केल जात आहे. याकरिता मला त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करावेसे वाटते. खरेतर कवी आपल्या जगण्याच्या समृद्ध प्रवासातील एक पथिक असतो. त्याने आपल्या काव्यातून वास्तवता टिपण्याचा प्रयत्न केल्यास त्या कवितेला चळवळीचं रूप होऊन कविता एक मशाल होउ शकते.
या सांप्रत प्रवाहात अशी कविता जनजागरणाचे कार्य ही करते. असे कार्य करत राहणार्या या
माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे मला कौतुक वाटते. त्यांच्या सर्वच उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”
असे उदगार सुप्रसिद्ध कवी मा.प्रवीण दवणे ,ठाणे यांनी काढले.

माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आषाढस्य प्रथम दिवसे कविसंमेलन आणि स्वर्गीय केशवराव मारोतकर पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर विशेष अतिथी म्हणून जळगावचे सुप्रसिद्ध कवी प्रा. वा .ना.आंधळे उपस्थित होते.
प्रा.वा. ना.आंधळे सर म्हणाले की-” आषाढाचा प्रथम दिवस त्यानिमित्त होणारे कविसंमेलन, कालिदास, शकुंतला यांच्या जगण्यातील प्रेम,विरह स्मृतीच्या संगमावर स्वर्गीय केशवराव मारोतकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा हे सारे मला नितांत महत्त्वाचे वाटते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे दहावे वर्ष असणे,हेच एक पती प्रती निस्सीम प्रेम आणि मराठी कविता जिवंत रहावी ही श्रद्धा दिसून येते.
या स्मृतींना तेवत ठेवण्याचे काम करणारी माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानची ही श्रद्धा नितांत महत्त्वाची वाटते. स्वतःसोबत इतरांना लिहीत ठेवण्याचं कार्य करणाऱ्या विजया मारोतकर, विशाल देवतळे आणि त्यांच्या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्य मला फार गौरवास्पद वाटते .अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.

माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान च्यावतीने
आषाढस्य प्रथम दिवसे निमित्त कविसंमेलन आणि स्वर्गीय केशवराव मारोतकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या ऑनलाइन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी प्रा.प्रवीण
दवणे लाभलेअसून विशेष अतिथी म्हणून जळगाव येथील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा .ना. आंधळे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रास्ताविक सादर करतांना
माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रा.विजया मारोतकर म्हणाल्या की हे या पुरस्काराचे दहावे वर्ष असून माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान चा हा चोविसावा कार्यक्रम आहे. दर वर्षीच अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम निसर्गरम्य परिसरात जाऊन साजरा केला जातो परंतु सध्या कोरोना काळातील
लॉकडाऊन मुळे अशा प्रकारे ऑनलाईन आयोजन करावे लागत आहे, तरीही सर्वांचे लाभलेले सहकार्य व योगदान अतिशय महत्वाचे आहे.
आषाढस्य प्रथम दिवसे कवी संमेलनात सहभागी कवी कवयीत्री यांच्या कवितांचे परीक्षण करण्याचे कार्य
सुप्रसिद्ध कवी मंगेश बावसे आणि सुप्रसिद्ध कवयत्री उज्वला इंगळे यांनी पार पाडले.सर्वच कविता इतक्या उंचीच्या होत्या की कोणाला क्रमांक द्यावे ,याचीच परीक्षा द्यावी लागलेली आहे.असे त्यांचे मत आहे.
तरी सुद्धा नितांत पारदर्शकपणे परीक्षण केलेले आहे. आषाढस्य प्रथम दिवसे कविसंमेलनात 45 कवी कवयित्रींनी आपले व्हिडिओ पाठवून ऑनलाइन सहभाग नोंदविला त्यातून खालील प्रमाणे परस्कार प्रदान करण्यात आले. दमदार आवाजाचे धनी पुणे येथील सुप्रसिद्ध निवेदक श्री. महेश गाडगीळ यांनी आपल्या प्रभावीआवाजात पुरस्काराची घोषणा केली.

स्व.केशवराव मारोतकर स्मृती काव्यस्पर्धा 2021:पारीतोषिक विजेते
*************
प्रथम क्र.-1501 रु रोख व सन्मानपत्र
*मनीषा ताटपल्लिवार

व्दितीय क्रमांक 1001 रु रोख व
सन्मानपत्र
* गोविंद सालपे
*भूपेश नेतनराव
( विभागून )

तृतीय क्रमांक -500रु रोख व सन्मानपत्र
*अरुणा कडू

उत्तेजनार्थ-201 रु रोख व सन्मानपत्र
पारितोषिक
* श्रद्धा बूरले राऊत
*जीवन राजकारणे

त्यानंतर पारितोषिक प्राप्त विजेत्यांच्या कवितांचे कवी संमेलन संपन्न झाले. धनश्री पाटील यांनी अतिशय सुरेख रित्या पाहुण्यांचा परिचय करून दिला तर राजश्री कुळकर्णी यांनी आभार
प्रदर्शनाची भूमिका जबाबदारीने सांभाळली. कार्यक्रमाचे नेटके व सुरेख सूत्रसंचालन मंजुषा कौटकर यांनी केले. पडद्यामागील सुत्रधार या भूमिकेत उपाध्यक्ष विशाल देवतळे यांचे विशेष सहकार्य लाभले. माय मराठी नक्षत्र समूहाच्या संपूर्ण कार्यकारिणीतील पदाधिकारी प्रभाकर तांडेकर ,माधव शोभणे, चारुदत्त अघोर, अरुणा कडू, धीरज पाटिल,अरुणा
भोंडे ,निता अल्लेवार,डॉ. लीना निकम आणि सर्व सदस्यांनी खारीचा वाटा उचलला.कार्यक्रमाची तांत्रिक सहाय्य जबाबदारी उज्वला इंगळे यांनी अतिशय कौशल्याने सांभाळली.त्यांमध्ये त्यांना कंप्यूटर इंजिनियर मिथिलेश पाढेन,कारंजा लाड यांनी मोलाचे सहकार्य केले
युट्युब वर प्रसारित झालेल्या या साहित्यिक कार्यक्रमाची साहित्य वर्तुळात नेहमीप्रमाणेच चर्चा आहे. सर्वांनीच कार्यक्रमाची युट्युब वर उपस्थिती दर्शवत आपले भरभरुन
अभिप्राय नोंदविले,तसेच शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम फार उंचीवर गेला.