सावधान! पृथ्वीवर येतंय महाभयंकर वादळ; वेग १६ लाख किमी प्रति तास

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11295*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

168

सावधान! पृथ्वीवर येतंय महाभयंकर वादळ; वेग १६ लाख किमी प्रति तास

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थानवी दिल्ली – बदलते हवामान आणि कोरोना महामारीमुळे मागील २ वर्षात मानवी जीवनात प्रचंड बदल झाले आहेत. कोरोनाच्या लाटांसह वेगवेगळी वादळे, अवकाळी पाऊस आणि वाढत्या तापमानाचा सामना सध्या अनेक देश करत आहेत. त्यातच आता सूर्याच्या परिमंडळातून तयार झालेले एक महाभयंकर वादळ पृथ्वीच्या दिशेने झेपावत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. या वादळाचा वेग तब्बल १६ लाख ९ हजार ३४४ किमी प्रतितास इतका प्रचंड असून हे सौर वादळ रविवारी किंवा सोमवारी कोणत्याही क्षणी पृथ्वीवर धडकण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, या वाऱ्याचा वेग सध्या तुफान असला तरी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे त्याला आवर घातला जाईल आणि पृथ्वीवर पोहोचेपर्यंत वादळाचा वेग कमी होईल, मात्र असे असले तरीही अनेक यंत्रणांवर याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.

स्पेसवेदर डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सूर्याच्या परिमंडळातून या वादळाची निर्मिती झाली असून त्याचा परिणाम वेगवेगळ्या यंत्रणांवर होण्याची शक्यता आहे. रेडिओचे सिग्नल, विमानाची यंत्रणा, कम्युनिकेशनची माध्यमे आणि पाऊस या घटकांवर या वादळाचा विपरित परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर वादळामुळे होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे पुढील दोन रात्री ग्रहांचा रंग अधिक चमकदार दिसेल आणि त्यांच्याभोवती वादळामुळे निर्माण झालेली धूळही दिसू शकेल, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. तसेच सूर्यापासून तयार झालेले हे वादळ अत्यंत उष्ण असल्याने ते पृथ्वीवर आदळेल तेव्हा पृथ्वीचे तापमान वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उष्णतेचा विपरित परिणाम सॅलेटाईटवर झाल्यास आपल्या मोबाईल सिग्नलमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे. तर, वीज गेल्यास अनेक शहरे अंधारात बुडण्याची शक्यता आहे. १९८९ मध्ये आलेल्या सौर वादळामुळे कॅनडातील क्युबेक शहर १२ तासांसाठी अंधारात बुडाले होते. त्यामुळे लाखो लोकांना त्रास झाला होता.

सौर वादळ हे सूर्यावरील चुंबकीय क्षेत्रातील अनियमिततेमुळे तयार होणारे वादळ आहे. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र जेव्हा जास्त शक्तीशाली होत असते तेव्हा सौर डागांची संख्या वाढते. मोठ्या झालेल्या डागाच्या ठिकाणी स्फोट होऊन सौरवादळांची निर्मिती होते. सौर वादळांचा प्रत्यक्षात मानवी शरीरावर परिणाम आढळत नाही. मात्र उपग्रह यंत्रणा, वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.