भंडारदऱ्यात झिंगाट पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11290*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

181

भंडारदऱ्यात झिंगाट पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थाअहमदनगर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्यटनस्थळांवर बंदी घातलेली असली तरीही विकेंडला अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळते आहे. अहमदनगरमधील प्रसिद्ध भंडारदरा धरणावरही नियमित गर्दी होत असून तेथे तळीरामांचाही अड़्डा झाला आहे. शनिवारीही येथे मोठी गर्दी झाली होती. त्यातीलच काही झिंगाट तळीरामांनी पोलिसांवर अरेरावी करत त्यांच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनीच त्यांची चांगली झिंग उतरवली.

शनिवारी भंडारदरा परिसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी एक पर्यटक या धरणात बुडाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम सुरू केली. मात्र, बुडालेल्या पर्यटकाबाबत पोलिसांना काहीच माहिती मिळाली नाही.  यावेळी तेथील मद्यधुंद असलेल्या पर्यटकांनी पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

यावेळी स्थानिक दुकानदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पर्यटकांनी त्या दुकानदारालाच मारहाण केली. मग पोलिसांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न करताच दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी पोलिसांनाच अरेरावी करत त्यांच्यावर हात उचलला. हा सर्व प्रकार पाहताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली आणि या पर्यटकांना पकडले. यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवत या पर्यटकांना पोलीस ठाण्यात नेले.