माहीम परिसरात एनसीबीची धाड, लहान मुलांना चरस देणाऱ्याला अटक

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11286*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

176

माहीम परिसरात एनसीबीची धाड, लहान मुलांना चरस देणाऱ्याला अटक

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई – सुशांतसिंग राजपूत ड्रग्स प्रकरणानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ड्रग माफियांच्या विरोधात युद्ध सुरू केले आहे. मुंबईला लागून असलेल्या नालासोपारा भागात एनसीबीने एक ऑपरेशन केले. तर नुकतीच, एनसीबीने हाय-प्रोफाइल पार्ट्यांमध्ये बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या स्टार्सना ड्रग्ज पुरवल्या प्रकरणी कार्यवाही करत लकडावाला नावाच्या बड्या ड्रग माफियाची माहिती मिळाली. तर आता मुंबईच्या माहीम परिसरात नुकतीच नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने कारवाई केली असून मोठ्या प्रमाणात चरस सारख्या अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या ड्रग्ज तस्करीत १५ -२० अल्पवयीन मुलांचा समावेश होता. ड्र्ग्सच्या विळख्यातून या मुलांची NCBने सुटका केली आहे.

या प्रकरणी एका ड्रग्ज तस्कऱ्याला अटक करण्यात आली असून या कारवाईत NCBने चरस आणि हशीसचा साठा जप्त केला आहे. लहान मुलांना व्यसनांच्या अधीन करायचे त्यांच्यामार्फत ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी त्यांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. माहीममध्ये शनिवारी रात्री केलेल्या या कारवाईनंतर अल्पवयीन मुलांचे NCBकडून समुपदेशन करण्यात आले असून त्यांना सोडण्यात आले आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून NCB कडून अनेक कारवाया सुरू आहेत. माहीम परिसरातील स्थानिक नागरिकांनी ड्रग्जची तस्करी होत असल्याची तक्रार NCB कडे केली होती. त्यानंतर NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली माहीम परिसरात पाळत ठेवून ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यात आली.