Home Breaking News रूप रिसॉर्ट नजीकच्या जंगलात एकाची गळफास लावून आत्महत्या

रूप रिसॉर्ट नजीकच्या जंगलात एकाची गळफास लावून आत्महत्या

0
रूप रिसॉर्ट नजीकच्या जंगलात एकाची गळफास लावून आत्महत्या

रूप रिसॉर्ट नजीकच्या जंगलात एकाची गळफास लावून आत्महत्या

-सिरपूरबांध परिसरातील घटना )

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,देवरी – नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील सिरपूरबांध येथील रहवासी सुरेश माणीकलाल उके वय अंदाजे ४० वर्ष याचा मृतदेह हायवे मार्गावरील रूप रिसॉर्ट नजीकच्या जंगलातील एका झाडाला गळफास लावून आज शनिवार १० जुलै रोजी मृत अवस्थेत आढळल्याने सिरपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक सुरेश उके हा नजीकच्या छत्तीसगढ राज्यातील बाघनदी पेट्रोल पंपावर काम करीत होता. हा नेहमी बाघनदी वरून देवरीला बँकेत रक्कम भरण्यासाठी येत असे. शुक्रवारला पण तो देवरीला आला होता; असे सुत्रानी सांगीतले. नंतर शुक्रवार पासून घरी परतलाच नाही. तो बेपत्ता असल्यामुळे घरच्या लोकांनी याची इतरत्र चौकशी केली असता याचा कुठेच अतापता लागला नाही. शेवटी घरच्या लोकांनी देवरी पोलीसात याबाबत तक्रार दाखल केली. परंतू , शनिवारला सकाळच्या सुमारास सिरपूरबांध येथील काही लोक आपल्या शेतात जात असताना रूप रिसॉर्ट परिसरातील जंगलातील झाडाला गळफास लावून सुरेश उके हा लटकत्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती मृतकाच्या कुटुंबीयांना आणि देवरी पोलीसांना देण्यात आली असून या मृत्यूमागचे कारण अद्यापही कळू शकले नाही. मृतकाच्या मागे पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे. या प्रकरणाची नोंद देवरी पोलिसांनी केली असून या आत्महत्या मागचे रहस्य काय आहे ? या बाबतची पुढील चौकसी पोलीस करीत आहेत.