Home Breaking News ताडोबातील वाघ चांदोलीला जाणार, वनविभागातर्फे हालचाली सुरू

ताडोबातील वाघ चांदोलीला जाणार, वनविभागातर्फे हालचाली सुरू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11266*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

61 views
0

ताडोबातील वाघ चांदोलीला जाणार, वनविभागातर्फे हालचाली सुरू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थानागपूर- देशातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या वाघांचे चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्यात येणार आहे. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ चांदोलीच्या सह्याद्री व्याघ‘ प्रकल्पात सोडण्याच्या हालचाली वनविभागाने सुरू केल्याचे सुत्रांनी सांगितले.

सध्या काही प्रकल्प क्षेत्रात वाघांची संख्या अत्यल्प असून, काही ठिकाणी अधिक आहे. जास्त संख्या असणार्‍या क्षेत्रातील वाघ कमी संख्या असणार्‍या प्रकल्प क्षेत्रात आणून सोडण्यासह वाघांच्या संवर्धनासाठी आवश्यक बाबींवर दिल्लीत तीन वर्षांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रानंतरच्या बैठकीत विचारविनिमय झाला होता. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या.
दुसरीकडे, राज्यातील ताडोबा प्रकल्प क्षेत्रात क्षमतेपेक्षा जास्त वाघ नोंदले गेले आहेत. त्यामुळे त्या वाघांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. चंद्रपूर, गडचिरोलीत वाघांची संख्या मोठी आहे. मानवी अतिक्रमणामुळे जंगल व मानवी वस्ती यांच्या सीमारेषा अस्पष्ट झाल्या आहेत. देशातील अशा जादा संख्येने वाघ असणार्‍या क्षेत्रातील काही वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून प्रकल्प क्षेत्राचा गेल्या तीन वर्षांपासून अभ्यास सुरू आहे. यात प्रामुख्याने वाघ कुठे फिरतात, कसे राहतात, प्रकल्प क्षेत्रातील वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल आहे का ? आदींचा सर्वंकष अभ्यास केला गेला. हा अहवाल अंतिम टप्प्यात असून, अहवाल सादर झाल्यानंतर सह्याद्री प्रकल्पात वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील मिळणार आहे.
राज्य वन्यजीव संवर्धन आराखड्यानुसार वाघांचा अधिवास वाढवण्याचा प्रस्ताव आहे. कोयना व चांदोली अभयारण्य परिसरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. वाघांचे प्रमुख खाद्य असणार्‍या सांबराची या परिसरात संख्या कमी आहे. त्यामुळे सांबर तसेच चितळ सागरेश्वर अभयारण्य व कात्रज येथून आणून प्रकल्प क्षेत्रात सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी 14 हेक्टरचे संरक्षित क्षेत्र तयार करण्याचे काम सुरू आहे.
सह्याद्रीत वाघांचा संचार
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात सात वाघांचा अधिवास आणि संचार आहे. विष्ठा, पाऊलखुणा आणि कॅमेरा ट्रॅपिंग याद्वारे वाघांचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे. 2018 मध्ये कॅमेर्‍यात एका वाघाची छबी टिपण्यात आली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या पुनर्वसनाला परवानगी मिळाल्यानंतर एनटीसीच्या सूचनेनुसार राज्यात तसेच इतर व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात जिथे वाघांची संख्या जास्त आहे तिथून येथे वाघ आणले जाणार आहेत.