Home Breaking News शाळेच्या जगेवरील ओसीडब्लूचे अतिक्रमण हटवून पुन्हा शाळा चालू करा – आप ची...

शाळेच्या जगेवरील ओसीडब्लूचे अतिक्रमण हटवून पुन्हा शाळा चालू करा – आप ची मागणी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11237*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

139 views
0

शाळेच्या जगेवरील ओसीडब्लूचे अतिक्रमण हटवून पुन्हा शाळा चालू करा – आप ची मागणी

विदर्भ वतन, नागपूर : शुक्रवारी 3 वाजता, मंगळवारी झोन, छावणी चौक, नागपूर येथे ओसीडब्लू च्या विरोधात निदर्शने करण्यात आले. हे आंदोलन विधर्भ संयोजक देवेंद्र वानखेड़े यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम नागपुर संयोजक आकाश कावळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. प्रमुख्यनी या आंदोलनाला नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले, उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे, विधर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, नागपुर युवा संयोजक गिरीश तीतरमारे उपस्थित होते.


नागपूर महानगर पालिका शालेय शिक्षण विभागाकडून मंगळवारी झोन अंतर्गत तीन अधिक प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. ज्या परिसरातील शाळा बंद केल्या गेल्या आहेत, त्या परिसरातील विद्यार्थ्यांना इतर परिसरातील जाऊन शिक्षण घेण्याची सुविधा आहे परंतु सरकारी शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी मुळी गरीब घरची, झोपडपट्टीतील कामगाराची मुले-मुली असतात त्यांना दुस-या शाळेत प्रवास करने परवडणारे नाही

शिक्षण हक्क कायद्यानुसार परिसरातील बालकांना त्यांच्याच परिसरात प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. मात्र, शालेय शिक्षण विभाग शाळा बंद करून खाजगी कंपनीला देण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी झोन मधे दिसून येत आहे.. ही कंपनी दुसरी तिसरी नसून आपल्या परिचयातील ओसीडब्लू  आहे. ही कंपनी बड्या अधिकारी वगार्शी संगमत करून हळू-हळू नागपुरातील सरकारी शाळा बंद पडण्याचे कट-कारस्थान करत आहे.

डउह ने आपले कार्यालय स्थलांतरित करावे. अन्यथा आम आदमी पाटीर्तील कार्यकर्ते आपल्या कार्यालयाला नरमाईने खाली करतील व पूर्ववत शाळा सुरू करतील. या कार्यक्रमाला संघटन मंत्री हरीश गुरबानी, सचिव अल्का पोपटकर, बनसोड काका, प्रवेश लांडगे, बाबा मेंढे, प्रभात अग्रवाल, दयानंद येटा, राहुल कावळे, डॉ.रायलू, जयश्री गाडगे, विश्वजित मसराम, रवी घोष, जॉय बांगडकर, अभिषेक घाटोडे, स्वप्नील सोमकुवर, पंकज मेश्राम, गुणवंत सोमकुवर, स्वीटी इंदोरकर, प्रियंका तांबे, पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते उपस्तित होते.