Home Breaking News नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन बेरोजगारांची ३६ लाख ३0 हजार रुपयांनी फसवणूक

नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन बेरोजगारांची ३६ लाख ३0 हजार रुपयांनी फसवणूक

36 views
0

नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन बेरोजगारांची ३६ लाख ३0 हजार रुपयांनी फसवणूक

विदर्भ वतन,भंडारा : द स्काऊट गाईड आॅर्गनायझर या संस्थेमध्ये सहाय्यक स्कॉऊट मास्टर आणि सहाय्यक गाईड कॅप्टन या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन बेरोजगारांची ३६ लाख ३0 हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार भंडारा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोंदिया शहरातील दोन जणांविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरुषोत्तम गजानन मेर्शाम (५५) रा.बाबा किराणा जवळ, स्मशान भूमी बालाघाट रोड, गोंदिया आणि पंकज नेतराम चौरागडे (५0) रा. सिव्हिल लाईन, गोंदिया अशी आरोपींची नावे आहेत.
हेमा रमेश निनावे (२७) रा. भंडारा व अन्य लोकांना आरोपी पुरुषोत्तम आणि पंकज यांनी द स्काऊट गाईड आॅर्गनायझर या संस्थेमध्ये सहाय्यक स्कॉऊट मास्टर आणि सहाय्यक गाईड कॅप्टन या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. याबाबत आरोपींनी बेरोजगारांसोबत २0१९ मध्ये संपर्क साधला होता. नोकरीसाठी पैसे लागणार असल्याचे आरोपींनी सांगितले होते. त्यामुळे हेमा निनावे व अन्य बेरोजगारांनी पुरुषोत्तम व पंकज यांना ३६ लाख ३0 हजार रुपये दिले. यात काही रक्कम रोख स्वरुपात तर काही धनादेशाच्या स्वरुपात होती.
पैसे दिल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजताच हेमा निनावे यांनी भंडारा पोलिस ठाण्यात तक्र ार दाखल केली. तक्र ारीवरुन भंडारा पोलिसांनी पुरुषोत्तम मेर्शाम आणि पंकज चौरागडे या दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ४२0, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.