Home Breaking News मनी लाँडरिंगप्रकरणात परमबीर सिंग यांची इडी चौकशी होणार

मनी लाँडरिंगप्रकरणात परमबीर सिंग यांची इडी चौकशी होणार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11214*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

197 views
0

मनी लाँडरिंगप्रकरणात परमबीर सिंग यांची इडी चौकशी होणार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थामुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप करणारे परमबीर सिंग स्वतः ईडीच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय लवकरच त्यांची चौकशी करून जबाब नोंदवण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, परमबीर सिंह यांना या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर होण्यास सांगितले असून, सिंह यांनी आरोग्याच्या कारणास्तव जबाब नोंदवण्यासाठी काही अवधी मागून घेतला होता. सिंह आणि देशमुख यांचा सहभाग असलेल्या या प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून काही दिवसांपूर्वी सिंह यांना हे समन्स बजावण्यात आले होते.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटके असलेले संशयास्पद वाहन आढळल्याच्या तपासानंतर सिंह यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटविण्यात आले होते. तसेच त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणी वसुलीचा आरोप केला होता. या आरोपानंतर अनिल देशमुख यांनीही राजीनामा द्यावा लागला होता.
दरम्यान, याप्रकरणी माजी गृहमंत्री देशमुख यांना ईडीने तीन वेळा समन्स बजावले. मात्र, ते हजर झाले नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तर ईडीने याप्रकरणी दोन वेळा वाझे याची नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात जाऊन चौकशी केली असून, न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर आज, शनिवारी पुन्हा एकदा त्याची चौकशी करण्याची शक्यता आहे.