राज्यात कोरोना रुग्ण संख्या घटली, पण मृतांचा आकडा चिंताजनक

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11210*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

189

राज्यात कोरोना रुग्ण संख्या घटली, पण मृतांचा आकडा चिंताजनक

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थामुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने काही दिवसांपूर्वी धुमाकूळ माजवला होता. प्रामुख्याने महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या  आढळून आली. मात्र, आता दुसरी लाट ओसरताना दिसत असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागांमध्ये निर्बंधही शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आटोक्यात येताना दिसत नाही. कारण मागील चोवीस तासांत राज्यात तब्बल २०० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्याचा मृत्यूदर २.०३ टक्के इतका आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे १ लाख २५ हजार ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात विशेषतः मुंबईतील परिस्थिती गंभीर आहे. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक १५ हजार ५९९ मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूदर वाढत असला तरी रोजची कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खालीच नोंदवली जात असल्याचे दिसून येत आहे.

मागील २४ तासात राज्यात ८ हजार ९९२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६१ लाख ४० हजार ९६८ वर पोहोचली आहे. राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांपैकी ५९ लाख ४४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल शुक्रवारी दिवसभरात १० हजार ४५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १२ हजार २३१ असून राज्याचा रिकव्हरी रेट ९६.०८ टक्के इतका आहे.