Home इतर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी नागपूर महानगर पालिका सर्व जागा लढवणार !

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी नागपूर महानगर पालिका सर्व जागा लढवणार !

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11203*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

60 views
0

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी नागपूर महानगर पालिका सर्व जागा लढवणार !

विदर्भ वतन, नागपूर : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आगामी नागपूर महानगर पालिका निवडणूकीत भाग घेणार असून सर्व १५१ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे नागपूर शहर बी. आर.एस.पी.चे अध्यक्ष शरद वंजारी यांनी एका पत्राव्दारे कळविले.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, बीआरएसपीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विधीतज्ञ अ‍ॅड.डॉ. सुरेश माने यांनी नागपूर शहरातील प्रदेश पदाधिकारी,शहर विधानसभा व महिला मोर्चा, बी.आर.व्ही.एम. च्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची, मंगळवारी ६ जुलै रोजी आॅनलाईन नियोजन बैठक घेतली. याबैठकीत चचेर्अंती निर्णय घेण्यात आल्याने शरद वंजारी म्हणाले. नागपूर महानगर पालिका निवडणूक तयारीसाठी को-आॅडीर्नेशन कमिटीची डॉ. सुरेश माने यांनी घोषणा केली. यामध्ये विशेष फुटाणे, रमेश पाटील, सी.टी.बोरकर, पंजाबराव मेश्राम, विश्रांती झांबरे, एच.डी.डोंगरे, राजरतन मोटघरे, शरद वंजारी,अ‍ॅड. भिमराव शेन्डे, एस. टी.पाझारे, भास्कर बांबोळे, हरिष नक्के, डॉ. विनोद रंगारी इत्यादिंचा समावेश आहे.