चित्रपट निर्माते कुमार रामसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11188*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

178

चित्रपट निर्माते कुमार रामसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थामुंबई – हॉरर चित्रपटांची निर्मिती करून १९८० आणि ९०च्या दशकात चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या रामसे ब्रदर्सचे कुमार रामसे यांचे आज सकाळी ५.३०च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक चित्रपटांचा काळ असताना रामसे बंधूंनी हॉरर चित्रपट काढण्याचे धाडस केले. त्यांनी भूत, आत्मा, शैतान, प्रेत अशा गोष्टींवर आधारित अनेक भयपटांची निर्मिती केली. त्यामुळे १९८० आणि ९०च्या दशकात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. पुराना मंदिर, साया, खोज अशा चित्रपटांसाठी त्यांनी पटकथालेखनाचे काम केले होते.