Home Breaking News ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर भाजप नेत्यावर भडकल्या

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर भाजप नेत्यावर भडकल्या

0
‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर भाजप नेत्यावर भडकल्या

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर भाजप नेत्यावर भडकल्या

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थामुंबई- बॉलिवूड चे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं काल ७ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. यातच हरियाणामधील भाजपचे सोशल मीडिया आणि आयटी विंगचे प्रमुख अरुण यादव यांनी एक विचित्र ट्विट केलं. त्यांच्या या ट्विटवर नाराजी व्यक्त करत अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चांगलंच उत्तर दिलंय.

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर हरियणामधील आयटी विंगचे प्रमुख अरुण यादव यांनी एक विचित्र ट्विट केलं आहे. यात त्यांनी लिहिलं, ‘फिल्मी जगतात हिंदू नाव ठेवून पैसा कमवणारे मोहम्मद यूसुफ खान (दिलीप कुमार) यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीचं न भरून येणारं नुकसान आहे.शोकग्रस्त कुटुंबासाठी तीव्र संवेदना! देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.भावपूर्ण श्रद्धांजली !’

या ट्विटवर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी अरूण यादव यांचं विचित्र ट्विट शेअर करत ‘तुम्हाला लाज वाटली पाहीजे. ‘, असं सणसणीत उत्तर ट्विटमध्ये अरुण यादव यांना दिलंय. अरूण यादव यांच्या ट्विटला उत्तर देताना उर्मिला मातोंडकर यांनी थम्ब्स डाऊन इमोजीचा देखील वापर केलाय.

दिलीप कुमार खरं नाव युसूफ खान होतं. मात्र बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी त्यांचं नाव बदलून दिलीप कुमार असं केलं. ‘ज्वार भाटा’ या सिनेमामध्ये १९४४ मध्ये देविका राणीनं मोहम्मद युसुफ खानना नायकाची भूमिका दिली व पडद्यावरील नाव दिलीप कुमार ठेवण्यास सुचवलं. तेव्हापासून मोहम्मद युसूफ खान, दिलीप कुमार झाले.