Home Breaking News दररोज १५०० लोकांना मोफत अन्न देणाऱ्या भारतीयाचा ब्रिटनकडून सन्मान

दररोज १५०० लोकांना मोफत अन्न देणाऱ्या भारतीयाचा ब्रिटनकडून सन्मान

0
दररोज १५०० लोकांना मोफत अन्न देणाऱ्या भारतीयाचा ब्रिटनकडून सन्मान

दररोज १५०० लोकांना मोफत अन्न देणाऱ्या भारतीयाचा ब्रिटनकडून सन्मान

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थाहैद्राबाद – कोरोना काळातच नव्हे तर गेली दहा वर्षे अनेकांना दररोज मोफत अन्न देणाऱ्या हैद्राबादच्या ४१ वर्षीय सय्यद उस्मान अझर मकसुसी यांनी आपल्या दानशूरतीचे उदाहरण जगासमोर ठेवलेे आहे. याचीच दखल ब्रिटनने घेतली आणि सय्यद उस्मान यांना ब्रिटनच्या कॉमनवेल्थ पॉईंट ऑफ लाइट पुरस्कार जाहीर केला आहे.

निराधार अर्थात डोक्यावर छप्पर नसलेल्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय हैदराबादच्या मकसुसी यांनी केली. सुरुवातीला अतिशय छोट्या स्वरुपात सुरू केलेल्या या मोफत भोजनालयाचे गेल्या दहा वर्षांत खूप मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. सध्या सय्यद अझर दररोज जवळपास १५०० लोकांच्या मोफत जेवणाची व्यवस्था करतात. सय्यद यांच्या याच दानशूरतेची दखल थेट ब्रिटनने घेतली आहे. सय्यद उस्मान अझर मकसुसी यांना ब्रिटनच्या कॉमनवेल्थ पॉईंट ऑफ लाइट पुरस्कार जाहीर झाला आहे.

सय्यद यांनी २०१५ साली सैनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या नावानं एक सामाजिक संस्था सुरू केली होती. ‘दो रोटी’ कम्पेनच्या माध्यमातून त्यांनी हैदराबादमधील नागरिकांना गरीब आणि निराधार लोकांचे पोट भरण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. यासाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेतिला आणि कोणताही आधार नसलेल्याना अन्न मिळावे यासाठी अन्न गोळा करण्यास सुरुवात केली होती. याशिवाय, भुकेला कोणताही धर्म नसतो या बोधवाक्यावर चालणाऱ्या सय्यद यांनी कोरोना काळात गरीबांना अन्न उपबल्ध करुन देण्यासाठी खूप मेहनत घेतली. हजारो नागरिकांना फूड पॅकेट्सच्या माध्यमातून अन्नदान सुरू ठेवले होते. दरम्यान, त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांना “कॉमनवेल्थ पॉइंट्स ऑफ लाइन पुरस्कारासाठी निवड झाली. या पुरस्करसाठी त्यांनी ब्रिटीश डेप्यूटी हायकमिशनचे मनापासून आभार मानले आहेत.तसेच या पुरस्कारामुळे मला आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली असून, यापुढेही मी आणखी जोमाने काम करेन, असेही मत सय्यद यांनी यावेळी व्यक्त केले.