मणिपूर पुन्हा भूकंपाने हादरले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11168*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

166

मणिपूर पुन्हा भूकंपाने हादरले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्थाइम्फाळ – गेल्या काही दिवसांपासून सतत भूकंपाचे हादरे बसत असलेल्या मणिपूरमध्ये आज सकाळी ५.५६ वाजता भूकंप झाला. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता ४.५ रिश्‍टर स्केल एवढी नोंद झाली होती. या भूकंपाचे हादरे उखरुलच्या ५७ किमी परिसरात जाणवले, अशी माहिती राष्ट्रीय सिस्मोलॉजी केंद्राने दिली. या भूकंपात कोणतेही नुकसान झाले नसले तरी सतत होणाऱ्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मणिपूर आणि परिसरात सतत लहान मोठे भूकंप होत आहेत. सोमवारी सायंकाळी दिल्ली-एनसीआर परिसरातही भूकंप झाला होता. त्याची तीव्रता ३.७ रिश्टर स्केल होती. त्यापूर्वी २० जूनला दिल्लीच्या पंजाबी बाग परिसरात भूकंप झाला होता. त्याची तीव्रता २.१ रिश्‍टर स्केल होती. त्यानंतर आज मणिपूरमध्ये भूकंप झाला. त्याची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल होती. तर काही दिवसांपूर्वीच मणिपूरमध्ये ५.२ रिश्‍टर स्केलचा भूकंप झाला होता.