Home Breaking News स्वीडनमध्ये भीषण विमान अपघात; पायलटसह ९ जणांचा मृत्यू

स्वीडनमध्ये भीषण विमान अपघात; पायलटसह ९ जणांचा मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11164*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

87 views
0

स्वीडनमध्ये भीषण विमान अपघात; पायलटसह ९ जणांचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : स्टॉकहोम – स्वीडनमध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली असून यात विमानाचा पायलट आणि आठ स्कायडाइव्हर्सचा मृत्यू झाला आहे. स्वीडनच्या ज्वाइंट रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (जेआरसीसी)च्या म्हणण्यानुसार, हे एक लहान प्रोपेलर विमान होते, ज्याला ओरेब्रो विमानतळाजवळ स्टॉकहोमपासून १६० किमी अंतरावर अपघात झाला.

जेआरसीसीने सांगितले आहे की, या विमानातून एकूण ९ जण प्रवास करत होते. अगदी उड्डाण घेतानाच विमानाचा अपघात झाला कारण अपघातानंतर हे विमान रनवेवर आढळून आले. दरम्यान, २०१९ मध्ये उत्तर पूर्व स्वीडनमधील यूमीया शहरात अशाचप्रकारे विमान दुर्घटना घडली होती. त्यावेळीदेखील ९ जणांचा मृत्यू झाला होता.