आम आदमी संघर्ष परिषद संघटनेने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

145
विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – दिवसेगानिक वाढतअसलेल्या महागाई विरोधात जनता होरपळून निघत आहेर :-लॉक डाऊन काळात कित्येक लोकांचे दुकाने, प्रतिष्टान, रोजगार जाऊन बेरोजगार झाले त्या मुळे आर्थिक परिस्थिती एकदम कमजोर झाली असून जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरण कंपनी द्वारे  वीज बिलात 18% अधिभार लावणे, विज बिल न भरल्यास कनेक्शन कापणे,वीज बिल वसुली अधिकारी द्वारा ग्राहकास धमकावणे या सगळ्या त्रासापासून नागरिक अनुचित मार्गाशी जाण्यास विचाराधीन झालेला आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम आदमी संघर्ष  परिषदेचे  राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण पोटे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री नितीन राऊत यांना आज निवेदन देण्यात आले या निवेदनात सांगण्यात आले की वीज बिला वरती लावण्यात आलेला अतिरिक्त अधिभार कम करण्यात यावा तसेच वीज धारकाचे वीज कनेक्शन न कापता त्यांना वीज बिल भरण्यासाठी 3 ते 4 हप्ते वारी करून सुविधा देण्यात यावी,आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास व जर अशी कोणतीही घटना घडल्यास भविष्यात आम आदमी संघर्ष परिषद कडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागपूर शहर संघटने कडून देण्यात आला आहे.निवेदन देते वेळी दिलिप नरवडिया,मुकुंद आडेवार,सचिन खोब्रागडे,सुनील साहू, सलाम भाई सह आम आदमी संघर्ष परिषद चे पदाधिकारी उपस्थित होते.