Home Breaking News महापालिकेच्या अजनी येथील वृक्षतोड धोरणावर शिवसेनेचा हल्लाबोल

महापालिकेच्या अजनी येथील वृक्षतोड धोरणावर शिवसेनेचा हल्लाबोल

160 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – मुंबई येथील आरेचे जंगल राज्य सरकारने वाचविले. त्याच धर्तीवर नागपूर शहरातील अजनी वन वाचवू असा, विश्वास देत शिवसेनेने महापालिकेच्या वृक्षतोड धोरणावर हल्लाबोल केला. ज्या प्रकल्पाची पार्श्वभूमीच तयार नाही अशा प्रकल्पासाठी शंभर वर्ष जुने ४ हजार ९३० वृक्ष तोडीच्या महापालिकेच्या निर्णयाचा यावेळी विरोध करण्यात आला. रेल्वे विकास निगम लिमिटेड (आरवीएनएल) आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआई) च्या संयुक्त अजनी परिसरात इंटर मॉडल स्टेशनचे (आईएमएस) निर्माण होणार आहे. याकरिता हजारो वृक्ष तोडण्यात येणार आहे. परंतु, याचा विरोध पर्यावरण प्रेमींसह शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
ज्या प्रमाणे मुंबईतील आरे जंगल वाचविले त्याप्रमाणे अजनी वन वाचविण्याकरिता संघर्ष करू असा, इशारा शिवसेनेचे संपर्क प्रमुख तसेच आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी महापालिकेला दिला. इंटर मॉडल स्टेशनसाठी शिवसेनेचा विरोध नाही. परंतु, हा प्रकल्प योग्य जागेवर तयार करण्यात यावा तसेच वेळेत पूर्ण करावा. याकरिता राज्य सरकारही सहकार्य करण्यास तयार आहे. याकरिता हे मॉडल स्टेशन अन्य ठिकाणी हलवावे लागेल. यावर विचार व्हावा, अन्यथा शिवसेना या विरोधात तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, सुरेश साखरे, शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, नगरसेविका मंगला गवरे, महिला आघाडी संपर्क प्रमुख मंदाकिनी भावे, शहर संघटक विशाल बरबटे, मंगेश काशीकर, किशोर परते, मुन्ना तिवारी, योगेश गोन्नाडे, बंडू तळवेकर, गुड्ड रहांगडाले, नाना झोडे, विक्रम राठोड, नितीन नायक, सुरेखा खोब्रागडे, माधुरी पालीवाल, सुशीला नायक, अर्पणा साखरकर, आशिष मानपिया, अतुल काटकर, भूपेंद्र कठाने, राजेश वाघमारे, सोनू शुक्ला, रमा कुकडे, विशाल कोरके, ओमी यादव, पुरुषोत्तम काद्रीकर, शेखर खरवडे, अजय दलाल, रूपेश बोराडे, शशिधर तिवारी, आशिष त्रिवेदी, दीपक पोहनकर, संजय पांडे, रमेश पवार, नीलेश तिघरे, सीताराम शाहू, विजय शाहू, श्रीकांत खंडाळे, मोरेश्वर हुलके, नितीन साळवे, रवी गौर, अजय माने, अरविंद राजपूत, आशिष ढेगे, सुनील यादव, परमात्मा पांडे, मंगेश वाघ, चेतन कश्यप यासह मोठा प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.