57 महिलांना लावले नादी, पोलिसांनी अखेर ठोकली बेडी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11136*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

219

57 महिलांना लावले नादी, पोलिसांनी अखेर ठोकली बेडी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, पुणे – शिक्षण बारावी नापास मात्र थाट सैन्य दलातील एखाद्या अधिका-यासारखा. त्या जोरावरच त्याने तब्बल चौघींना फसवणून चार वेगळे संसार थाटले. त्याचबरोबर ५३ तरुणींना जाळ्यात ओढून त्यांना ही फसवण्याचा डाव रचणा-या योगेश दत्तु गायकवाड (वय.२७,रा. डोंगरगाव,ता.कन्नड) या ठगाला पुणे पोलिसांनी थेट औरंगाबादेत जावून बेड्या ठोकल्या. पुण्यातील एका तरुणीला जाळ्यात खेचून त्याने लग्न केले. त्यानंतर तिला व तिच्या घरच्यांना विश्वासात घेऊन नात्यातील आणि गावातील तरुणांना सैन्य दलात नोकरी लावण्याच्या आमिषाने ५0 लाखाचा गंडा घातला. त्यानंतर तो कर्तव्यावर जात असल्याचे सांगून निघून गेला होता.
संशय आल्यामुळे घरच्यांनी त्याची माहिती गोळा केली तेव्हा त्याचे बिंग फुटले.गायकवाडने आतापर्यंत ४0 ते ४५ तरुणांना नोकरीच्या आमिषाने ५0 लाखापेक्षा अधिक रूपयांची फसवणूक केल्याचे पोलिासांनी सांगितले. त्याचा दुसरा साथीदार संजय ज्ञानबा शिंदे (रा. केडगाव, जि. अहमदनगर) याला देखील अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून सैन्य दलातील जवानांची वर्दी, एक चारचाकी गाडी, दोन दुचाकी असा ५ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका तरुणीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी ही आळंदी देवाची येथे राहत असून, जानेवारी २0२0 मध्ये आईच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका हॉस्पिटलमध्ये आली होती. त्यावेळी पीएमपी बस स्थानकावर बसची वाट पाहत असताना आरोपी योगेशचे आधारकार्ड तरुणीला सापडले. त्यावेळी तिने आवाज देत योगेशला आधार कार्ड दिले. त्यानंतर त्याने फियार्दी तरुणी आणि तिच्या आईसोबत ओळख वाढविली. लष्करामध्ये असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून तरुणीच्या आईचा विश्वास संपादित केला. त्यानंतर तरुणीसोबत खोटे लग्न करून तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी दोन लाख रुपये घेतले. योगेशने तरुणीच्या गावातील तरुणांचा विश्वास संपादित करून आतापर्यंत ५३ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या बद्दल तक्रार आल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.
आळंदी देवाची येथील तरुणी व तिच्या घरच्यांना फसवल्यानंतर आरोपी गायकवाड हा धमकी देऊन पसार झाला होता. याच कालावधीत त्याने औरंगाबाद येथील एका तरुणीला जाळ्यात खेचून संसार सुरू केला होता. पोलिस त्याच्या पहिल्या संपर्क क्रमांकावरून माग काढत होते. त्याच्या एका घराचा पत्ता मिळाल्यानंतर त्याने ते घर बदलले होते. दहा ते बारा ठिकाणी तो फिरला होता. औरंगाबाद येथील सिडको परिसरात तो वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ निरीक्षक सुनील झावरे, यांच्या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, सहायक निरीक्षक राजेश उसगावकर कर्मचारी तात्या देवकते, अमित पुजारी, सतीश मोरे, दिपक लोधा, तानाजी सागर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले.