Home Breaking News कुही तालुक्यात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्प उभारण्यात यावे

कुही तालुक्यात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्प उभारण्यात यावे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11131*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

63 views
0

कुही तालुक्यात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्प उभारण्यात यावे

– आमदार राजूभाऊ पारवे यांनी मा. सुभाष देसाई,उद्योग व खनिकर्म मंत्री यांना दिले निवेदन

विदर्भ वतन, नागपूर- बुधवारला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे उमरेड विधानसभा क्षेत्रातील, कुही तालुक्यात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्प उभारण्यात यावे. याबाबत मा. राजू पारवे आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र यांनी मा. सुभाष देसाई साहेब उद्योग व खनिकर्म मंत्री यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.


कुही येथे “पाहिजे त्या प्रमाणात प्रकल्पाकरिता अनुकुलता असून जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचप्रकारे कुही तालुक्यातला बराचसा भाग हा गोसेखुर्द प्रकल्प बाधित क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा व तसेच या ठिकाणी गोसेखुर्द प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याकारणाने हा प्रकल्प येथे सुरू करणे अत्यंत सोईचे होईल. या बाबतीत सुद्धा मागणी मा. आमदार राजू पारवे यांनी केली व पेट्रोकेमिकल प्रकल्प विविध संसाधनासाठी क्रूड तेल, नैसर्गिक वायू, खनिज आणि खनिजे या सारख्या नैसर्गिक संसाधनाचे उत्पादनामध्ये रूपांतर करतात. या प्रकल्पाचा विधानसभा क्षेत्रात कुही तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्हात या प्रकल्पाचा फायदा होईल. जागतिक दजार्चे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स या तालुक्यात होईल असे मा. मंत्री महोदय यांना मा.आमदार राजु पारवे समजवून सांगितले. त्यावेळी बाळासाहेब थोरात साहेब महसूल मंत्री म.रा. तसेच मा.श्रीमती वर्षा गायकवाड शालेय शिक्षणमंत्री हे सुध्दा उपस्थित होते.