Home Breaking News डेल्टाच्या पाठोपाठ आता आला लेम्बडा कोरोना अवतार

डेल्टाच्या पाठोपाठ आता आला लेम्बडा कोरोना अवतार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11117*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

115 views
0

डेल्टाच्या पाठोपाठ आता आला लेम्बडा कोरोना अवतार

जास्त प्राणघातक! मलेशियन आरोग्य मंत्रालयाची माहिती

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : क्वालालंपूर – डेल्टा या कोरोना व्हायरसच्या प्रकाराने संपूर्ण जगात माजवलेली दहशत कायम असतानाच आता लॅम्बडा हा कोरोनाचा नवा अवतार सापडला आहे. तो डेल्टापेक्षा कितीतरी अधिक प्राणघातक आहे, असे मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. हा विषाणू अवघ्या ४ आठवड्यांत ३० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे, अशी माहिती मलेशियाने दिली आहे.

लॅम्बडा हा कोरोना विषाणूचा नवा प्रकार सर्वप्रथम पेरूत आढळला होता. पेरू हा कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर असलेला जगातील एकमेव देश आहे, असे मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याच ट्विटचा हवाला देत ऑस्ट्रेलियाच्या न्यूज पोर्टलने ब्रिटनमध्येही कोरोनाचा हा विषाणू आढळण्याचे म्हटले आहे. द स्टारने दिलेल्या माहितीनुसार डेल्टापेक्षा हा विषाणू अधिक वेगाने पसरतो. पेरुत मे आणि जून या दोन महिन्यात केलेल्या कोरोना रुग्णांच्या तपासणीत ८२ टक्के रुग्णांमध्ये हा विषाणू सापडला. मे आणि जूनमध्ये दक्षिण अमेरिकन चिली या देशात या विषाणूचे ३१ टक्के रुग्ण सापडले होते. जागतिक आरोग्य संघटनेनेही लॅम्बडा या नव्या विषाणूविषयी चिंता व्यक्त केली आहे. हा विषाणू अतिशय वेगाने पसरतो आणि तो अँटीबॉडीला दाद देत नाही, असे डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांचे मत आहे. ब्रिटनमध्ये लॅम्बडाचे ६ रुग्ण सापडले आहेत. मात्र त्यावर अजून संशोधन सुरू असल्याने त्याविषयी नेमके आत्ताच सांगता येणार नाही, असे ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.