Home Breaking News मोदी सरकारकडून खासगीकरणाचा धडाका, ३६ उद्योग अर्थ मंत्रालयाकडे ट्रान्सफर

मोदी सरकारकडून खासगीकरणाचा धडाका, ३६ उद्योग अर्थ मंत्रालयाकडे ट्रान्सफर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11112*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

149 views
0

मोदी सरकारकडून खासगीकरणाचा धडाका, ३६ उद्योग अर्थ मंत्रालयाकडे ट्रान्सफर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारची एका बाजूला मंत्रीमंडळ विस्ताराची लगबग सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला अवजड उद्योग मंत्रालयातील ३६ पेक्षा अधिक उद्योग अर्थ मंत्रालयाकडे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. यामुळे सरकारी उद्योगांचे खासगीकरण करणे सुलभ होणार आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारी कंपन्या, उद्योग आणि बँकांच्या खासगीकरणाचा मोदी सरकारने धडाका लावला आहे. यात अनेक उद्योगांचे खासगीकरण शेवटच्या टप्प्यात आहे. कंपन्यांच्या खासगीकरणाची ही प्रक्रिया अधिक सुरळीत होण्याच्या दृष्टीने भेल, एचएमटी, स्कूटर्स इंडिया आणि अँड्रु युले यांच्यासह ३६ बडे उद्योग अर्थ मंत्रालयाकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. हे उद्योग यापूर्वी अवजड उद्योग मंत्रालयाकडे होते.

एअर इंडिया, पवन हंस, बीईएमएल, स्कूटर्स इंडिया, भारत पंप कॉम्प्रेशर्स, सेल यांच्या खासगीकरणाची घोषणा सीपीएसईने केली आहे. हिंदुस्तान फ्लोरोकार्बन, हिन्दुस्तान न्यूज प्रिंट, एचएलएल लाइफ केअर, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स, ब्रिज अँड रूफ इंडिया, एनएमडीसी या उद्योगांच्या खासगीकरणाला सीपीएसईने परवानगी दिली आहे. एकंदर ही खासगीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ३६ उद्योग अर्थ मंत्रालयाकडे वर्ग केले आहेत.