हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : शिमला – हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते वीरभद्र सिंह यांचे आज पहाटे ४च्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. शिमलातील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जनक राज यांनी दिली.

हिमाचल प्रदेशाचे तब्बल ६ वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना १२ एप्रिल आणि ११ जून अशी दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी दोन्हीवेळा कोरोनावर मात केली. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत नेहमी बिघडत होती. त्यामुळे त्यांना इंदिरा गांधी मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले, असे डॉ. जनक राज यांनी सांगितले. वीरभद्र सिंह ९ वेळा आमदार म्हणून आणि ५ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. ते ६ वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिभा सिंह, मुलगा आणि शिमला ग्रामीणचा आमदार विक्रमादित्य सिंह आणि मुलगी अपराजिता सिंह असा परिवार आहे.

You missed