आजपासून राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11102*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

250

आजपासून राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – आजपासून राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील पाच दिवस राज्यात कोकणासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. आज पुण्यासह मराठवाडा, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहे. राज्यात पुन्हा एकदा मान्सूची वापसी झाल्याचं हे संकेत आहेत.

उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 9, 10 आणि 11 जुलै रोजी कोकणातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यानच्या तीन दिवसांत कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 9 जुलै रोजी सिंधुदुर्ग, 10 जुलै रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर 11 जुलै रोजी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्हांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्या वेगवाग वाऱ्यासह विजांचा कडकडाटह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

खरंतर, सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील मान्सून वापसीला हेच कारण कारणीभूत आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि ओडीशा राज्याच्या किनारपट्टी परिसरात देखील कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय होतं आहे. येथून पुढे काही दिवस राज्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीसी कमी होण्याची शक्यता आहे.