Home Breaking News सुशिक्षितांना संधी, जुन्यांना डच्चू, नव्या ४३ मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

सुशिक्षितांना संधी, जुन्यांना डच्चू, नव्या ४३ मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

0
सुशिक्षितांना संधी, जुन्यांना डच्चू, नव्या ४३ मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

सुशिक्षितांना संधी, जुन्यांना डच्चू, नव्या ४३ मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली- पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात सर्वात प्रथम राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील खासदार नारायण राणे यांना मंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर सर्वानंद सोनोवाल यांच्यासह एकूण 43 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील या चौघांची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागली आहे. मंत्रिमंडळ विस्त्तारात उच्चशिक्षित, तरुण यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात ६ डॉक्टर, ५ अभियंता आणि १३ वकील असून ३६ नवनिर्वाचित मंत्री आहेत. तर ७ जुने मंत्री आहेत. या फेरबदलात प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांचे मंत्रिपद गेले.

या मंत्र्यांनी घेतली शपथ

1. नारायण राणे 2. सर्बानंद सोनोवाल 3. वीरेंद्र कुमार 4. ज्योतिरादित्य सिंधिया 5. आरसीपी सिंह 6. अश्विनी वैष्णव 7. पशुपति कुमार पारस 8. किरण रिजिजू 9. राजकुमार सिंह 10. हरदीप सिंह पुरी 11. मनसुख मंडाविया 12. भूपेंद्र यादव 13. पुरुषोत्तम रूपाला 14. जी किशन रेड्डी 15. अनुराग ठाकुर 16. पंकज चौधरी 17. अनुप्रिया पटेल 18. सत्यपाल सिंह बघेल 19. राजीव चंद्रशेखर 20. शोभा करंदलाजे 21. भानुप्रताप सिंह वर्मा 22. दर्शना विक्रम जरदोश 23. मीनाक्षी लेखी 24. अन्नपूर्णा लेखी 25. ए नारायण स्वामी 26. कौशल किशोर 27. अजय भट्ट 28. बीएल वर्मा 29. अजय कुमार 30. देवसिंह चौहान 31. भगवंत खूबा 32. कपिल पाटिल 33. प्रतिमा भौमिक 34. सुभाष सरकार 35. भगवत कृष्ण राव कराड़ 36. राजकुमार रंजन सिंह 37. भारती प्रवीण पवार 38. विश्वेश्वर टुडू 39. शांतनु ठाकुर 40. महेंद्र भाई मुंजापारा 41. जॉन बारला 42. एल मुरुगन 43. नीतीश प्रामाणिक यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.

या मंत्र्यांनी दिले राजीनामे

रविशंकर प्रसाद , प्रकाश जावडेकर , थावरचंद गहलोत (सामाजिक न्याय मंत्री) , डॉ. हर्षवर्धन (आरोग्य मंत्री) रमेश पोखरियाल निशंक (शिक्षण मंत्री),अश्विनी चौबे (आरोग्य राज्य मंत्री) देबोश्री चौधरी (महिला बाल विकास मंत्री), सदानंद गौड़ा (उर्वरक और रसायन मंत्री), संतोष गंगवार (कामगार राज्य मंत्री), संजय धोत्रे (शिक्षण राज्य मंत्री), बाबुल सुप्रियो, प्रताप सारंगी, रतन लाल कटारिया यांनी राजीनामा दिला.

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन उत्तर प्रदेश ८, गुजरात ६ , महाराष्ट्रला ४ मंत्रीपदे देण्यात आली आहेत. नवीन मंत्रिमंडळात उत्तर प्रदेशातील 8, गुजरात 6, अरुणाचल प्रदेश १, आसाम १, बिहार १ ,हिमाचल प्रदेश १, झारखंड १ ,कर्नाटक 3, मध्यप्रदेश २, महाराष्ट्र 4, मणिपूर १, नवी दिल्ली १, ओडिशा २, राजस्थान १,तेलंगाना १, तामिळनाडू १ ,त्रिपुरा १ ,उत्तराखंड १, प.बंगाल 4 मंत्री आहेत.

शपथविधी पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४३ नव्या मंत्राबरोबर बैठक केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि बी. एल. संतोष उपस्थित होते. गेल्या वर्षापासून कोरोना महामारी भारतात मोठ्या प्रमाणात फैलावला. दुसर्या लाटेत मोठ्या प्रमाणत रुग्णांचा मृत्यू झाला. ही महामारीची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका सर्व स्तरातून झाली. ऑक्सिजन, बेड, औषधे, लस याचा तुटवडा अनेक राज्यात भासला होता. ही परीस्थी योग्य पद्धतीने हाताळता आली नसल्याने केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांचे मंत्रीपद या फेरबदलात गेले असे बोलले जात आहे.