ओबीसींची दिशाभूल भाजपचा निषेध

211
विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभे च्यावतीने सहा जुलै रोजी भाजपा व भाजपाच्या आमदारांच्या जाहीर निषेध संत जगनाडे चौक नंदनवन येथे करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कडून ओबीसींची दिशाभूल केली असून प्रांतिक तैलीक समाज महासभेने भाजपचा निषेध केला.
एकीकडे भाजपतर्फे ओबीसींच्या मुद्द्यावरून निलंबित केलेल्या बारा आमदारा वरील कारवाई परत घेणार या मागणीसाठी सरकारचा पुतळा जाळण्यात आला. तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर दिशाभूल करण्याचा आरोप करीत मंगळवारी जगनाडे चौकात प्रांतिक तेली समाज महासभेने निषेध आंदोलन केले.ओबीसी, मराठा व दलित, बांधवांमध्ये तेढ निर्माण करण्याचा दोन वर्षापासून सत्तेतून दूर झाल्यावर देवेंद्र फडणवीस व त्याची सहकारी करीत आहे. असा आरोप लावून भाजपचा निषेध करीत आंदोलन केले. यावेळी महासंघाचे प्रदेश सचिव रुपेश बांगडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले असून यावेळी सुखदेव वंजारी, आदित्य पंधरे, योगेश न्यायखोर, सुरज फंदी, विक्रांत जीवनकर, निलेश तिघरे, पंकज कुंभलकर, गौरव गुप्ता, सुमित पिंपळकर, राजेश मेंढे,  विजय राजगिरे, सुनील अवचट व मंगेश तसेच समाजबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.