Home Breaking News जाठराग्नी व आरोग्य

जाठराग्नी व आरोग्य

0
जाठराग्नी व आरोग्य

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर

– डॉ. पल्लवी स. थोटे
एम.डी. (संहिता सिद्धांत)
एम.ए. (संस्कृत स्कॉलर)
जाठराग्नी म्हणजे पाचनशक्ती होय. आज भुकेची जाणीव ठेवणारे म्हणजेच भुक लागण्याची संवेदना खूप कमी लोकांना जाणवते. कारण सकाळपासून रात्री झोपण्यापर्यंत बरेच लोक सतत काहीतरी खात असतात. तुम्हाला माहिती आहे का? भुकेचा पण वेग असतो. म्हणजे भूक लागल्यावर खाल्लयास शरीरतंत्र उत्तम राहते. अन्यथा आजाराला निमंत्रण दिल्या जाते. त्याचप्रमाणे भुक लागली असताना पण न खाणे आरोग्यास घातक आहे. आयुर्वेद शास्त्रात चिकित्सा म्हणजेच उपचार करताना पाचनशक्तीचे अतिशय जास्त महत्व आहे. कारण तुमची पाचनशक्ती चांगली असेल तरच शरीराची वाढ होईल. रस,रक्त,मांस,मेद,अस्थि मज्जा आदी सुव्यस्थित बनतील. शरिरात निर्मित, स्थिती, लय जठराग्नीवर अवलंबून असते. त्यामुळे अग्नी पाचनशक्ती विकृत होण्यासाठी कारणे व उपाय बघू.
१.अभोजन : भुक लागलो असल्यास भोजन न करणे.
२. अतिभोजन : भुक लागली असल्यास भोजन न करने
३. अजीर्णावस्थेत भोजन : पहिला आहार पचला नसता म्हणजेच भुक न लागल्यास खाणे.
४. विषम भोजन : कधी खूप जेवण करणे, कधी जेवण करणे.
५. संदुष्ट भोजन : शिळे अन्न, आंबवलेले अन्न, खूप शिजवलेले अन्न खाणे.
६. गुल शीत लक्ष भोजन : पचायला जड पदार्थ. उदा. पनीर, श्रीखंड, खवा, पोळी असे मधुरादी पदार्थ अधिक खाणे.
७.वेग धारण : मुत्रत्याग किंवा मलत्याग आदी थांबवून ठेवण्याची सवय असणे.
८.अत्यंबुपान : तहान नसताना पाणी पीणे.
वरील सर्व कारणे पाचशक्ती विकृत करतात. आयुर्वेद उपचार पद्धतीमध्ये अग्नीमंद झाल्यास वाढवतात. त्यााठी पाचक पदार्थ सुंठ, मिरे, पुदीना, जिरे आदीचा उपयोग होतो.
अग्नी तीव्र झाल्यास माहिष दुग्ध (म्हशीचे दूध) दुग्धजन्य पदार्थाचा उपयोग होतो.
अग्नी विषम (अधिक कधी कमी जाणवल्यास) त्यावर अग्नी सुव्यवस्थित ठेवणारी औषधी नियोजन केले जाते.
पंचकर्मामधील वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य, बस्ती आदी कर्माचा अग्नी पर्यायाने शारीरिक बल प्रस्थापित करण्यासाठी उपयोग होतो.
मागील लेखात सांगीतले होते की, सध्या वर्षाऋतुमध्ये पाचनशक्ती मंद होते व आजार होतात. त्यामुळे वरील कारणाचा त्याग करावा. जिरे, सुंठ, धनी पावडर, लसून आदीचा वर्षा ऋतुमध्ये पाचनशक्ती वाढविण्यासाठी उपयोग होतो.
आयुर्वेद उपचार पद्धतीमध्ये वाढलेले शरीरातील दूषित पदार्थ पंचकर्माद्वारे बाहेर काढले जाते. कमी झालेले घटक वाढवले जाते. व समान अवस्थेतील घटक समावस्थेत राहण्यासाठी उपचार केले जाते. आयुर्वेद शास्त्रातील शुद्ध चिकित्सा बद्दल काही थोडे सांगावेसे वाटते. शरीरातील एक घटक वाढला असताना दुसरा घटक समान असेल तर तो समान अवस्थेतच रहावा व वाढलेला घटक पुन्हा आपल्या परिमाणात यावा यासाठी प्रयत्न केले जाते. याप्रकारे शरीरातील घटकांचे संतुलन ठेवणारी आयुर्वेद ही उत्कृष्ठ उपचार पद्धती आहे.
– डॉ. पल्लवी स. थोटे
एम.डी. (संहिता सिद्धांत)
एम.ए. (संस्कृत स्कॉलर) नागपूर, मोक़्र – 9637976004