ऑफ्रोह संघटनेचे सविंधान चौक ,नागपूर येथे साखळी उपोषण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11082*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

250

– अधिसंख्य पद नको आफ्रोहची मागणी

विदर्भ वतन, नागपूर- आफ्रोह संघटनेचा आज उपोषणाचा दुसरा दिवस असून अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने अधिसंख्य ठरलेल्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर ऑर्गनायझेशन फोर राइट्स ऑफ वुमन या आफ्रोह संघटनेच्या वतीने सोमवार पासून संपूर्ण राज्यभर साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. नागपुरात 5 जुलै पासून ते 7 जुलै पर्यंत सविधान चौकामध्ये कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत. अधिसंख्य पद रद्द करावे. ते आपले हक्क सोडणार नाही. परंतु या उपोषणा दरम्यान कोणतीही नेते किंवा पदाधिकारी, यासंबंधातील अधिकारी भेटण्यास आले नाही. अशा वेळेस भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळेंनी आज सकाळी साडेअकरा वाजता उपोषणा दरम्यान भेट दिली आणि त्यांनी सांगितले की तुमचे प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिले. संघटनेचे राज्याध्यक्ष श्री शिवानंद सहारकर , राज्य. कार्याध्यक्ष् श्री राजेश सोनपरोते यांनी दिलेल्या माहितीनुसार आदिवासी विकास विभाग, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व राज्यातील अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडून आकश ठेऊन कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्र
रद्दबातल ठरवल्या जात आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या भोंगळ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. अधिसंख्य पद रद्द करून अधिकारी-कर्मचाऱ्यांना पूर्वपदावर वर्ग करण्यात यावे. या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. याप्रसंगी श्री दामोधर खडगी अध्यक्ष श्री नरेंद्र निमजे सचिव श्री प्रवीण मदनकर कार्याध्यक्ष श्रीमती मधु पराड उपाध्यक्षा श्रीमती अनघा वैद्य राज्य महिला अधक्ष्या, दिलीप भानुसे हे सर्व उपोषणाला सहभागी होते.