प्रेमीयुगलांनी वीष प्राशन करून केली आत्महत्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11071*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

164

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,पारशिवनी-पारशिवनी तालुक्यात डुमरी कला येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने तसेच २५ वर्षीय मुलाने कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डुमरी कला येथील अल्पवयीन मुलगी अंजली रमेश चौधरी (वय १५) व याच गावातील सोहन रूपचंद देवढगले (वय २५) यांनी सोबत विषारी कीटकनाशक औषध प्राशन केले. त्यावेळी सोहनच्या घरातील मंडळी शेतात कामावर गेले होते. त्याचदरम्यान सकाळी दहा ते दोन वाजताच्या दरम्यान अंजली सोहनच्या घरी आली. त्यांनी घरातील बाथरूममधील आतून दरवाज्याला कडी लावून विष प्राशन केले.
दुपारी सोहनची आई दुपारी शेतातून घरी आली असता घरात कीटकनाशक औषधाची दुर्गंधी येत असल्याने ते शोधत असताना घरातील बाथरूमचे दार आतून लावलेले दिसले. यावेळी आजूबाजूच्या लोकांना बोलावून बाथरूमचे दार उघडण्यात आले असता सोहन व अंजली हे दोघेही विष घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. दोघांनाही रामटेक उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता अंजलीला डॉक्टरांनी तपासून अंजली मृत झाल्याचे घोषित केले. तर सोहनची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तत्काळ नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याच्याही मृत्यू झाला. पारशिवनी पोलिस घटनेचा तपास करीत आहे.