अचानक वीज पडून शेतातील झोपडीत आसरा घेतलेल्या पाचपैकी तिघांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11064*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

113

अचानक वीज पडून शेतातील झोपडीत आसरा घेतलेल्या पाचपैकी तिघांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,रामटेक – तालुक्यातील चोरखुमारी शिवारात माजी पंचायत समिती सदस्य हरिसिंह धोंडबा सोरते यांच्या शेतात मंगळवार, ६ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक वीज पडून शेतातील झोपडीत आसरा घेतलेल्या पाचपैकी तिघांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.


यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, रामटेक तालुक्यातील चोरखुमारी शिवारात माजी पंचायत समिती सदस्य हरिसिंह सोरते यांची शेती आहे. सध्या पावसाळ्याची कामे सुरू असल्याने शेतामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी सुरू होती. अचानक आभाळ भरून आले व जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतमालक हरिसिंह सोरते (वय ५२) रा. शीतलवाडी रामटेक, दिलीप मंगल लांजेवार (वय ४५) रा. डोंगरी, ट्रॅक्टर मालक योगेश अशोक कोकण (वय ३0) रा. चोरखुमारी तसेच शेजारी शेतात गुरे राखत असलेला गुराखी मधुकर सावजी पंधराम (वय ६५) व त्यांच्यासोबत असलेला त्यांचा नातू (मुलीचा मुलगा) नेहाल रामसिंग कुमरे (वय १२) दोघेही राहणार चोरखुमारी या पाचही जणांनी शेतातील झोपडीत आसरा शोधला. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. नेमका याचवेळी काळाने डाव साधला. काळ्याकुट्ट आभाळात जोरदार वीज कडाडली. झोपडीवर क्षणार्धात वीज पडली व यात योगेश अशोक कोकण, मधुकर सावजी पंधराम, दिलीप मंगल लांजेवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काळाने डाव साधला होता. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून या झोपडीतच असलेले हरिसिंह सोरते व नेहाल रामसिंग कुंभरे (१२) यांचे प्राण वाचले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
जखमींना उपचारार्थ तातडीने रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पोलिस स्टेशन देवलापार येथे र्मग दाखल करण्यात आला असून, ठाणेदार प्रवीण बोरकुटे पुढील तपास करीत आहेत.